
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ही इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील सर्वात यशस्वी टीम आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या टीमनं आजवर पाच वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यामध्ये मागील दोन वर्ष सलग पटकावलेल्या विजेतेपदांचाही समावेश आहे. आता यावर्षी (IPL 2021) मध्ये मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेतेपदाची हॅट्ट्रीक करण्याची संधी आहे.
मुंबई इंडियन्सची तयारी सुरु
आयपीएल स्पर्धेची वर्षातील दोन महिने नाही तर वर्षभर तयारी करण्याची मुंबई इंडियन्सची पद्धत आहे. मुंबई इंडियन्सचे तेंव्हाचे कोच जॉन राईट (John Wright) यांनी एका स्थानिक स्पर्धेत जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) बॉलिंग पाहिली होती. त्यानंतरच्या आयपीएल ऑक्शनमध्ये मुंबईनं बुमराहला करारबद्ध केलं. त्यानंतर जे घडलं तो इतिहास आहे.
( वाचा : मोहम्मद अझहरुद्दीननं काढले 54 बॉल्समध्ये 137 रन्स, 11 सिक्स आणि 9 फोरसह केले अनेक रेकॉर्ड्स! )
यावर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्सनं तयारी सुरु केली आहे. या तयारीचा भाग म्हणून त्यांनी नागालँडच्या (Nagaland) ख्रीविस्तो केन्स (Khrievitso Kense) या 16 वर्षांच्या लेग स्पिनरची ट्रायलसाठी निवड केली आहे.
कोण आहे ख्रीवत्सो?
एखाद्या आयपीएल टीमचं लक्ष वेधून घेणारा ख्रीवत्सो हा नागालँडचा पहिला खेळाडू आहे. त्यानं सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy 2021) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. या 16 वर्षांच्या क्रिकेटपटूनं पहिल्याच स्पर्धेत सर्वांना प्रभावित केलं. त्यानं चार मॅचमध्ये 5.47 च्या इकॉनॉमी रेटनं 7 विकेट्स घेतल्या. 16 रन्स देऊन तीन विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
‘ईस्टर्न मिरर’नं दिलेल्या वृत्तानुसार ख्रीवत्सोनं मुंबई इंडियन्सच्या एका अधिकाऱ्याला चांगलंच प्रभावित केलं. त्यामुळे त्याची ट्रायलसाठी निवड झाली आहे. नागालँडमधील एका छोट्या गावातल्या या तरुण खेळाडूसाठी ही मोठी गोष्ट आहे. तो या ट्रायलमध्ये पास झाला तर यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्यावर चांगली बोली लागण्याची शक्यता आहे.
( वाचा : राहुल द्रविडच्या शिकवणीत घडत असलेला ‘हा’ खेळाडू या वर्षी करणार धमाका! )
त्याला एखाद्या आयपीएल टीमनं खरेदी केलं तर तो आयपीएल टीमचा सदस्य बनलेला पहिला नागालँडचा खेळाडू असेल.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.