फोटो – ट्विटर

श्रीलंका क्रिकेटचा पाय आणखी गाळात गेला आहे. इंग्लंड विरुद्ध नुकतीच पार पडलेली T20 सीरिज (England vs Sri Lanka T20 Series 2021) श्रीलंकेनं 0-3 ने गमावली. श्रीलंकेचा सलग पाचव्या T20 सीरिजमध्ये पराभव झाला आहे. या पाचपैकी चार मालिकांमध्ये तर त्यांनाही एकही मॅच जिंकता आलेली नाही. श्रीलंकन क्रिकेटपटूंचा वेतनावरुन बोर्डाशी वाद सुरु आहे. हे सर्व कमी होतं म्हणून आता श्रीलंकेच्या तीन खेळाडूंना बायो-बबल मोडल्यानं (Bio Bubble Breach) इंग्लंडहून तातडीनं मायदेशी परत पाठवण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?

श्रीलंकन क्रिकेट फॅननं ट्विटरवर शेअर केलेला एक व्हिडीओ गेल्या काही तासांमध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये श्रीलंकेचे बॅट्समन कुशल मेंडिस (Kushal Mendis) आणि निराशेन डिकवेला (Niroshan Dickwella) हे दोघं इंग्लंडमधील रस्त्यांवर बायो-बबलचं उल्लंघन करुन फिरत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. 26 जून रोजी झालेल्या तिसऱ्या T20 मध्ये श्रीलंकेचा एकतर्फी पराभव झाला, त्याच रात्रीचा हा व्हिडीओ असल्याचा दावा या फॅननं केला आहे.

इंग्लंड विरुद्ध झालेल्या मोठ्या पराभवामुळे श्रीलंकन क्रिकेटपटूंवर टीका होत आहे. त्यातच हा व्हिडीओ उघड झाल्यानंतर त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली. श्रीलंकन क्रिकेट बोर्डानं या प्रकरणाची चौकशी करण्याचे टीम मॅनेजमेंटला आदेश दिले. त्या चौकशीमध्ये मेंडिस आणि डिकवेलासह दनुष्का गुणतालिका (Danushka Gunathalika) याने देखील बायो-बबलचं उल्लंघन (Bio Bubble Breach) केल्याचे आढळले. त्यामुळा आता या तिघांनाही टीममधून निलंबित करण्यात आलं असून तातडीनं श्रीलंकेला पाठवण्यात येणार आहे.

श्रीलंकन फॅन्स संतप्त

इंग्लंड विरुद्ध 26 जून रोजी संपलेल्या 3 मॅचच्या T20 सीरिजमध्ये श्रीलंकेला एकही मॅच जिंकता आली नाही. तिसऱ्या T20 मध्ये तर श्रीलंकेची टीम फक्त 91 रनवर ऑल आऊट झाली. त्या मॅचमध्ये इंग्लंडच्या ओपनर्सनी 105 रनची पार्टनरशिप केली होती. श्रीलंकेच्या संपूर्ण टीमला ही पार्टनरशिप देखील ओलांडता आली नाही. इंग्लंडनं 89 रननं मोठा विजय मिळवला.

या सीरिजमधील श्रीलंकन टीमच्या कामगिरीवर अनेक माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. श्रीलंकन फॅन्सनी तर सोशल मीडियावर श्रीलंकन क्रिकेटपटूंना अनफॉलो करण्याची मोहीम सुरू केली आहे. श्रीलंकेचा कॅप्टन कुशल परेराच्या (Kushal Perera) फॉलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

या सर्व अडचणींवर मात करत इंग्लंड विरुद्ध 29 जून पासून सुरु होणारी वन-डे सीरिज खेळण्याचं आव्हान श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंसमोर आहे.

वर्ल्ड कप फायनलमध्ये गंभीरची सेंच्युरी होऊ न देणारा बॉलर निवृत्त

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: