फोटो – ट्विटर

T20 वर्ल्ड कप नंतर टीम इंडियाचा लिमिटेड ओव्हरमध्ये कॅप्टन बदलणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आगामी वर्ल्ड कपनंतर विराट कोहली (Virat Kohli) या प्रकारातील कॅप्टनसी सोडेल आणि त्याच्या जागेवर रोहित शर्मा (Rohit Sharma) याची नियुक्ती होईल, असं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. बीसीसीआयनं अपेक्षेप्रमाणेच या चर्चा निराधार असल्याचं म्हंटलं आहे. या वर्ल्ड कपपूर्वी कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ न देणे हा यामागील उद्देश आहे. बीसीसीआयनं शक्यता फेटाळली असली तरी रोहित शर्मा हा विराटपेक्षा लिमिटेड ओव्हरमध्ये चांगला कॅप्टन (Why Rohit Sharma?) ठरु शकतो. याची 5 मुख्य कारणं आहेत.  

यशस्वी कॅप्टन

रोहित शर्मा हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्सनं पाच वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद जिंकले आहे. अन्य कोणत्याही कॅप्टनला आयपीएल इतिहासात तीन पेक्षा जास्त वेळा आयपीएल जिंकता आलेली नाही.

रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा रेकॉर्ड 80 टक्के आहे. रोहितच्या कॅप्टनसीमध्ये भारतानं 19 पैकी 15 T20 तर 10 पैकी 8 वन-डे मॅच जिंकल्या आहेत. 2018 साली झालेल्या निदहास ट्रॉफी आणि आशिया कप स्पर्धेचं विजेतेपद रोहितच्या भारतीय टीमनं जिंकलं आहे.

संकटकाळी परतण्याची किल्ली

रोहित शर्मा हा शांत आणि खंबीरपणे शेवटपर्यंत लढणारा कॅप्टन म्हणून प्रसिद्ध आहे. आयपीएलमधील मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) त्याची कॅप्टनसी ही त्याचं उदाहरण आहे. मुंबई इंडियन्सनं अनेक मॅच रोहितच्या कॅप्टनसीच्या जोरावर जिंकल्या आहेत. अगदी आयपीएल स्पर्धेत बाद होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुंबई इंडियन्सला रोहितनं ‘प्ले ऑफ’ मध्ये नेलं आणि पुढं विजेतेपद पटकावलं हा इतिहास आहे. रोहितची ही क्षमता मोठ्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाला उपयोगी कॅप्टनसीमध्ये (Why Rohit Sharma?) ठरणार आहे.

‘रोहित शर्माला टीम इंडियाचा कॅप्टन करावं, आपण अटीतटीच्या जास्त मॅच जिंकू’

सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये

रोहित शर्मानं लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करुन बराच कालाधी उलटला आहे. या प्रकारात ओपनिंग बॅट्समन म्हणून त्याचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याचबरोबर तो आता टेस्ट क्रिकेटमध्ये देखील स्थिरावला आहे.

रोहित शर्मा इंग्लंडच्या स्वींग खेळपट्ट्यांवर चालणार नाही, असा अनेकांचा अंदाज होता. रोहितनं या सर्वांना खोटं ठरवत इंग्लड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs England Test Series 2021) भारताकडून सर्वाधिक रन केले. त्यानं विदेशातील पहिली टेस्ट सेंच्युरी देखील ओव्हलमध्ये अगदी निर्णायक क्षणी झळकावली. तो सध्या टेस्टमध्ये भारताचा नंबर 1 बॅट्समन आहे. रोहितचा हा फॉर्म त्याला कॅप्टन (Why Rohit Sharma?) म्हणून काम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

विराटचं प्रेशर कमी होणार

विराट कोहली हा सध्या भारताचा तीन्ही प्रकारातील कॅप्टन आहे. सर्व प्रकारातील कॅप्टनसीचं प्रेशर विराटवर आता जाणवायला लागलं आहे. त्यानं नोव्हेंबर 2019 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही सेंच्युरी झळकावलेली नाही, हे आता सर्वांनाच माहिती आहे. सध्या प्रत्येक मॅचमध्ये विराटवर सेंच्युरीचा दबाव आहे. त्याची चांगली खेळी देखील सेंच्युरी पूर्ण न झाल्यानं अपूर्ण ठरत आहे.

विराट कोहलीवर याचा दबाव वाढत आहे. तो इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये अनेकदा एकाच पद्धतीनं आऊट झालाय. हे विराटवर दबाव वाढल्याचं लक्षण आहे. क्रिकेटमधील 3 पैकी 2 प्रकारात कॅप्टनसीचं प्रेशर कमी झालं तर विराट कोहलीला बॅटींगवर अधिक फोकस करता येईल. त्यानंतरच जुना ‘विराट रनमशीन कोहली’ परतेल. जुना विराट परतणे हे टीमसाठी आणि स्वत:  विराटसाठीही फायद्याचं असेल.

विराट कोहलीला जागं होण्याचा इशारा देणारा पराभव, अन्यथा….

आता नाही तर कधीच नाही

रोहित शर्माची योग्यता आणि क्षमता लक्षात घेता लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये त्याला कॅप्टन करण्याचा निर्णय यापूर्वीच व्हायला हवा होता. पण तो आजवर झालेला नाही. रोहित आता 34 वर्षांचा आहे. तो फिट राहिला तर आणखी काही सिझन क्रिकेट खेळू शकतो. पुढील वर्षी होणारा T20 वर्ल्ड कप आणि 2023 साली होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपसाठी टीम तयार करण्याची आणि तो जिंकण्यासाठी रोहितला पुरेसा वेळ लागेल. तो वेळ देण्यासाठी आता वेळ आली आहे. ही वेळ निसटण्यापूर्वी रोहितला T20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचा लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये कॅप्टन करणे आवश्यक (Why Rohit Sharma?) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: