सौजन्य- ट्विटर

नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट सीरिजमध्ये (India vs Sri Lanka Test Series 2022) हनुमा विहरीला (Hanuma vihari) तिसऱ्या नंबरवर बढती देण्यात आली. फर्स्ट क्लास क्रिकेटचे रेकॉर्ड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेत उपयुक्त योगदान देणाऱ्या विहारीकडं चेतेश्वर पुजाराची रिप्लेसमेंट म्हणून पाहिले जात आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) अनेक तरूण खेळाडुंना कोट्यावधी रुपयांची लॉटरी लागली, पण हनुमा विहारीला कोणत्याही फ्रँचायझींनी त्यांच्या टीममध्ये घेतलं नाही. आयपीएल ऑक्शनमध्ये अनसोल्ड ठरलेले विहारीसह 7 भारतीय खेळाडू आता बांगलादेशमधील ढाका प्रीमियर लीगमध्ये (Vihari in Dhaka Premiere league) खेळणार आहेत.

कोण आहेत खेळाडू?

हनुमा विहारी सध्या भारतीय संघासोबत नुकतीच टेस्ट सिरीज खेळला आहे. ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळण्याआधी तो हैदराबादला त्याच्या घरी जाणार आहे त्यानंतर हनुमा विहारी अबहानी लिमिटेड या टीममध्ये दाखल होईल. विहारीशिवाय या स्पर्धेत फस्ट क्लास क्रिकेटचा स्टार खेळाडू अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran), बाबा अपराजित (Baba Aparajith), परवेझ रसूल, 2010 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमधील (Under 19 World Cup 2010) टीम इंडियाचा कॅप्टन अशोक मनेरिया हे खेळाडू बांगलादेशमध्ये जाणार आहेत. त्याचबरोबर चिराग जानी आणि गुरिंदर सिंग हे खेळाडू देखील ढाका प्रीमियर लीग स्पर्धेत खेळणार आहेत.

कोहली-शास्त्रीनं नाकारलेल्या भारतीय खेळाडूनं दक्षिण आफ्रिकेत झळकावली सेंच्युरी

कोणत्या टीमकडून खेळणार?

अबाहानी लिमिटेडकडुन खेळणाऱ्या विहारीसोबतच भारताच्या पंधरा सदस्यीय टीममध्ये निवड झालेला अभिमन्यू ईश्वरनने ढाका प्रिमीयर लीग मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. प्राईम बँक या टीमचं प्रतिनिधित्व करताना तो दिसणार आहे. परवेझ रसूल शेख जमाल धानमोंडी टीमकडून खेळणार आहे. बाबा अपराजित रुपगंज टायगर या टीमचा भाग असेल. अशोक मनेरिया खेलाघर नावाच्या संघातर्फे खेळणार आहे. चिराग जानी आणि गुरिंदर सिंह अनुक्रमे लिजंड ऑफ रूपगंज आणि गाजी गृप ऑफ क्रिकेटर्स या टीमकडून खेळताना (Vihari in Dhaka Premiere league) दिसतील.

विहारी, इश्वरन, अपराजित, मनेरिया आणि रसूल यापूर्वी देखील ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळले आहेत. कोरोना महामारीपूर्वी (covid pandemic) झालेल्या सिझनमध्ये ते खेळले होते. त्याचबरोबर दिनेश कार्तिक, युसुफ पठाण हे आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील या स्पर्धेत खेळले आहेत.

ढाका प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक टीमला एक परदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी आहे. भारतच नाही तर पाकिस्तानचा मोहम्मद हफिज हा मोहमेडन स्पोर्टिंगकडून आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा शिनेपुकुरकडून खेळणार आहे.

एकूण किती टीम?

ढाका प्रीमियर लीग सुरुवातीला फिफ्टी ओव्हर (50 over tournament) फॉरमॅटमध्ये खेळवली जात होती. मागच्या वर्षीपासून ही स्पर्धा T20 फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. या लीगमध्ये एकूण 11 टीम सहभागी होतात. ‘राऊंड रॉबिन फॉरमॅट’मध्ये सर्व टीम एकमेकांशी खेळतात. टॉप 6 टीम सुपर लीगसाठी (Vihari in Dhaka Premiere league) पात्र ठरतात.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: