
सौरव गांगुली (Sourav Ganguly), महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे आजवरचे टीम इंडियाचे तीन यशस्वी कॅप्टन आहेत. गांगुलीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया तीन आयसीसी स्पर्धेच्या (ICC Championships) फायनलमध्ये गेली. त्यापैकी दोनमध्ये पराभव झाला तर एक स्पर्धेत संयुक्त विजेतेपद मिळाले. विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये आजवर तीन्ही आयसीसी स्पर्धेत टीम अपयशी ठरली आहे. तर महेंद्रसिंह धोनीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं T20 वर्ल्ड कप, वन-डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तीन्ही स्पर्धा जिंकल्या आहेत. या तीन्ही स्पर्धा जिंकणारा धोनी हा क्रिकेट विश्वातील एकमेव कॅप्टन आहे. धोनीच्या कॅप्टनसीमध्येच टीम इंडिया चॅम्पियन का बनली? याचे कारण माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं (Aakash Chopra On Dhoni) सांगितलं आहे.
धोनीचं वेगळेपण काय?
धोनीच्या कॅप्टनसीमध्ये टीमची भरभराट झाली याचं मुख्य कारण म्हणजे धोनीनं टीममधील खेळाडूंना स्थैर्य दिलं, असा दावा आकाश चोप्रानं केला आहे. साखळी फेरीतील (League Stages) मॅच असो वा बाद फेरीतील (Knockouts Games) धोनी जवळपास एकच टीम संपूर्ण खेळवत असे असे आकाश चोप्रानं सांगितलं.
“तुम्ही साखळी फेरी किंवा बाद फेरीच्या टप्प्यातील त्याची टीम पाहिली तर त्यामधील खेळाडू आणि हिरो कायम असत. मोठ्या मॅचमध्ये रन करु शकणाऱ्या खेळाडूंचा त्याच्या टीममध्ये नेहमी समावेश असे. क्वार्टर फायनल, सेमी फायनल किंवा फायनल या मोठ्या मॅचमध्ये जी टीम कमी चुका करते ती टीम जिंकते. त्या दबावात सातत्याने एकत्र खेळणारी टीम कमी गोंधळ करते, कारण त्या टीममधील खेळाडूंमध्ये सुरक्षिततेची भावना असते.” असे चोप्राने (Aakash Chopra On Dhoni) सांगितले.
2011 च्या वर्ल्ड कपमध्ये धोनीनं 7 खेळाडूंना सर्व 9 मॅचमध्ये खेळवलं. युसूफ पठाणच्या जागी सुरेश रैनाचा समावेश हाच त्या टीममधील एकमेव मोठा बदल होता. बाकी बदल धोनीनं दुखापत किंवा पिचमुळे एखाद्या मॅचपूरते केले होते.
2 वर्षांपासून विचारत नाही कुणी, टीम इंडियाच्या बॉलरला आठवला महेंद्रसिंह धोनी!
गंभीर, युवराजचे उदाहरण
आकाश चोप्रानं त्याचा मुद्दा पटवून देताना गौतम गंभीर (Gautam Gambhi) आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) या दोन खेळाडूंच्या कामगिरीचे उदाहरण दिले. T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2007) आणि क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2011) युवराज आणि गंभीरचा निर्णायक क्षणी खेळ उंचावला याचे कारण टीममधील त्यांना असलेली सुरक्षितता होती,” असे चोप्रा म्हणाला.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये सर्व टीमनं एकत्रित चांगली कामगिरी केली. तर T20 वर्ल्ड कप 2014 मध्ये (T20 World Cup 2014) विराट कोहलीचा अपवाद वगळता अन्य सर्व खेळाडू अपयशी ठरल्यानं फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये झालेला तो टीम इंडियाचा एकमेव पराभव (Aakash Chopra On Dhoni) आहे, असे चोप्राने यावेळी स्पष्ट केले.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.