
आधुनिक काळातील ‘ऑल टाईम ग्रेट’ क्रिकेटपटू असलेल्या एबी डीव्हिलियर्सनं (AB de Villiers) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2018 सालीच रिटायर झाला होता. त्यानंतर त्यानं आता वयाच्या 37 व्या वर्षी आयपीएलसह सर्व प्रकारच्या फ्रँचायझी क्रिकेटमधूनही रिटायरमेंट घेतली आहे. पहिल्या सिझनपासून (IPL 2008) ते 14 व्या सिझनपर्यंत (IPL 2021) आयपीएल सर्व सिझन खेळणारा डिव्हिलियर्स हा एकमेव विदेशी क्रिकेटपटू आहे. त्याला भारतामध्ये नेहमीच फॅन्सचं भरपूर प्रेम मिळालं. त्याबद्दल त्यानं रिटायर होत असताना आभार मानले आहेत. त्याचबरोबर मी आता अर्धा भारतीय बनलोय, अशी इमोशनल प्रतिक्रिया (ABD about India) त्यानं दिली आहे.
काय म्हणाला ABD?
‘मी आरसीबीसाठी दीर्घ काळ खेळलो. 11 वर्ष पाहता-पाहता संपली. आता टीमला सोडणे हा एक भावनिक अनुभव आहे. या निर्णयापर्यंत पोहचायला मला बराच वेळ लागला. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी बराच विचार करून हा निर्णय घेतला आहे. मी आरसीबी मॅनेजमेंट माझा मित्र विराट कोहली, तसंच सर्व सहकारी खेळाडू, कोच, स्टाफ आणि फॅन्सचे आभार व्यक्त करतो. आरसीबी नेहमीच माझ्या जवळची टीम असेल. मी नेहमी या टीमला पाठिंबा देत राहणार आहे.
डीव्हिलियर्स पुढे म्हणाला की, ‘मी आयुष्यभर आरसीबीयन राहणार आहे. आरसीबीच्या सेट-अपमधील प्रत्येक व्यक्ती माझा परिवार आहे. अनेक जण आली नंतर निघून गेली. पण, आरसीबीमध्ये एकमेकांच्या बद्दल जी भावना आणि प्रेम निर्माण झालं ते नेहमी कायम असणार आहे. मी आता अर्धा भारतीय (ABD about India) झालो आहे. मला त्याचा नेहमीच अभिमान असेल.’
ABD चा RCB रेकॉर्ड
डीव्हिलियर्स आयपीएलचे पहिले तीन सिझन (2008 ते 2010) दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. 2011 साली झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला आरसीबीनं करारबद्ध केलं. त्यानंतर आता रिटायर होईपर्यंत तो आरसीबीचा सदस्य होता. आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सोबतची त्याची जोडी सुपरहिट होती. या दोघांनी एकत्र आणि एकट्याच्या बळावर आरसीबीसाठी अनेक मॅच जिंकल्या. पण, या जोडीला एकत्र आयपीएल विजेतेपद जिंकता आले नाही.
20 सिक्स आणि 14 फोर, विराट-ABD चं IPL मध्ये वादळ
डिव्हिलियर्सनं आरसीबीसाठी 157 मॅचमध्ये 41.10 ची सरासरी आणि 158.33 च्या स्ट्राईक रेटनं 4522 रन केले. विराट कोहली (6707) नंतर तो आरसीबीकडून सर्वाधिक रन करणारा बॅटर आहे. डीव्हिलियर्सनं आरसीबीसाठी 2 सेंच्युरी आणि 37 हाफ सेंच्युरी झळकावल्या (ABD about India) आहेत.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.