फोटो – ट्विटर /ICC

राजकीय अस्थिरता, अंतर्गत यादवी, दहशतवाद आणि युद्ध याने पोखरलेल्या अफगाणिस्तानाच्या (Afghanistan) नागरिकांच्या आयुष्यात काही क्षणासाठी हास्य फुलवण्याचं काम त्या देशाचे क्रिकेटपटू करत असतात. सर्व प्रकारच्या प्रतिकुल परिस्थितीतही अफगाणिस्तानची क्रिकेट टीम सध्या क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमपेक्षाही चांगली खेळत आहे. 11 मार्च 2021 हा दिवस देखील अफगाणिस्तान क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहला जाणार आहे. त्या दिवशी अफगाणिस्तानकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली डबल सेंच्युरी करण्याचा विक्रम हशमतउल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) याने केला आहे.

सर्वोच्च स्कोअर

युएईमधील आबूधाबीमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे (Afghanistan vs Zimbawe) यांच्यात दुसरी टेस्ट सुरु आहे. या सीरिजच्या पहिल्या टेस्टमध्ये अफगाणिस्तानच्या बॅट्समननं निराशा केली होती.त्यामुळे त्यांचा अवघ्या दोन दिवसांमध्ये दहा विकेट्सनं पराभव झाला होता.

अफगाणिस्तानने दुसऱ्या टेस्टची पहिल्या इनिंग 4 आऊट 545 वर घोषित केली. हा त्यांच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर आहे. यापूर्वी 2019 साली बांगलादेशविरुद्ध काढलेले 342 रन हा अफगाणिस्तानचा सर्वोच्च स्कोअर होता. तो त्यांनी बराच मागे टाकला आहे.

( वाचा : आता बोला! भारताबाहेरची टेस्टही दोन दिवसांमध्ये संपली, 132 वर्षांनंतर झाला रेकॉर्ड )

307 रनची पार्टरनरशिप

अफगाणिस्तानला त्यांचा ओपनर इब्राहिम झारदान (Ibrahim Zardan) याने चांगली सुरुवात करुन दिली. 19 वर्षांच्या इब्राहिमने 72 रन काढले. चौथ्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या हशमतउल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) याला त्याचा कॅप्टन असगर अफगाण (Asghar Afghan) याने भक्कम साथ दिली.

असगरने हशमतउल्लाहच्या आधी 150 चा टप्पा पार केला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 307 रनची पार्टरनरशिप करत झिम्बाब्वेच्या बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला. असगर 257 बॉलमध्ये 164 रन काढून आऊट झाला. तो आऊट झाला तेंव्हा अफगाणिस्तानकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम त्याच्या नाववर होता.

हशमतउल्लाहचा रेकॉर्ड

हशमतउल्लाहने असगरचा रेकॉर्ड लवकरच मोडला. हशमतउल्लाहची ही पाचवीच टेस्ट मॅच आहे. यापूर्वी 2019 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्टमध्ये संथ खेळ आणि शॉर्ट बॉलचा नीट सामना करता येत नसल्याबद्दल त्याला वगळण्यात आले होते. या मॅचमध्ये मात्र त्याने कोणतीही संधी टीकाकारांना दिली नाही.  

( वाचा : IPL 2021 SRH : ‘आहे’ बॉलिंग भक्कम तरीही…काही प्रश्न कायम! )

त्याने जवळपास 10 तास (590 मिनिटे) किल्ला लढवला. 443 बॉलचा सामना करत हशमतउल्लाह शाहिदीने (Hashmatullah Shahidi) अफगाणिस्तानकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली डबल सेंच्युरी झळकावली.

अफगाणिस्तानने पहिली इनिंग 545 रनवर घोषित केली. त्यानंतर झिम्बाब्वेने सावध सुरुवात करत दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस बिनबाद 50 रन केले आहेत. दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या काही ओव्हरमध्ये राशिद खानचे (Rashid Khan) बॉल वळले. त्यामुळे आबुधाबी टेस्टच्या तिसऱ्या दिवशी राशिदचा सामना करण्याचे आव्हान झिम्बाब्वे समोर असेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: