फोटो – ट्विटर

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) ओली रॉबिन्सन (Olly Robinson) याला 8 वर्षांपूर्वीच्या वर्णद्वेषी ट्विट्सबद्दल (Racist Tweets) निलंबित केले आहे. रॉबिन्सनला आता पुढील चौकशी होईपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही. रॉबिन्सन या नवोदीत बॉलरवर कारवाई करत जगात वाहवा मिळवणारे इंग्लंड क्रिकेट बोर्ड आता अडचणीत आले आहे. त्यांच्या टीममधील वेगवेगळ्या खेळाडूंच्या जुन्या पोस्ट्स आता व्हायरल (Viral) होत आहेत. या पोस्ट वाचून त्यांनी देखील रॉबिन्सनसारखाच अपराध केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व इंग्लिश खेळाडूंवर वर्णद्वेषी टिप्पणीबद्दल (England Players Racist Comment) कारवाई होणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मॉर्गन आणि बटलर

इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कॅप्टन इऑन मॉर्गन (Eoin Morgan) आणि टीममधील प्रमुख खेळाडू जोस बटलर (Joss Buttler) हे दोघे भारतामध्ये नियमित आयपीएल खेळतात. मॉर्गन कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कॅप्टन आहे.तर बटलर राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) टीमचा मुख्य आधारस्तंभ आहे. आयपीएलमधून मिळणारा पैसा मिळवण्यासाठी इंग्लंडचं क्रिकेट बाजूला ठेवण्याची काही महिन्यापूर्वी बटलरची तयारी होती.

मॉर्गन आणि बटलर या दोघांनी भारतीयांच्या इंग्रजीबद्दल केलेले वर्णद्वेषी ट्विट्सचे स्क्रीनशॉट्स (England Players Racist Comment) आता व्हायरल झाले आहेत.  “I always reply sir no1 else like me like you like me” असं ट्विट बटलरनं केलं असून त्यावर मॉर्गननं “Sir, you play very good opening batting” असं उत्तर दिलं आहे.

 

विशेष म्हणजे हे ट्विट रॉबिन्ससारखे आठ वर्षांपूर्वीचे आणि तो शाळकरी मुलगा होते तेव्हाचे नाहीत. तर हे ट्विट्स 2018 साली केले सांगितले जात आहे. त्यावेळी बटलर आणि मॉर्गन हे दोघंही इंग्लंड टीममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिर झाले होते. त्यांचे मीडिया, सोशल मीडिया आणि अन्य सर्व ठिकाणी कशा पद्धतीने व्यक्त व्हावे याचे ट्रेनिंग नक्की झाले असणार. त्यामुळे त्यांचे हे ट्विट्स अधिक गंभीर आहेत. आता प्रकरण उघड झाल्यानंतर ECB ने या दोघांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

अँडरसनही अडकला!

इंग्लंडचा सर्वात यशस्वी बॉलर जेम्स अँडरसनचं देखील एक जुनं ट्विट व्हायरल झाले आहे. हे 2010 साली अँडरसननं केलेले ट्विट आहे. यामध्ये अँडरसननं त्याचा टीममधील सहकारी स्टुअर्ट ब्रॉडचा (Stuart Broad) नवा  हेअरकट 15 वर्षांच्या लेस्बियनसारखा असल्याचे म्हंटले होते.

आता हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर हा 11 वर्षांपूर्वीचा प्रकार(England Players Racist Comment) आहे. आता माझ्यात खूप बदल झालाय, असे स्पष्टीकरण अँडरसनने दिले. याच पद्धतीचे स्पष्टीकरण ओली रॉबिन्सन यानेही लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी दिले होते. नवोदीत रॉबिन्सनवर कारवाई करणारे इंग्लंडचे बोर्ड अनुभवी अँडरसनला हात लावणार का? हा प्रश्न आहे.

बदली खेळाडूही तसाच

ओली रॉबिन्सनला निलंबित केल्यानंतर डोम बेसचा (Dom Bess) इंग्लंड टीममध्ये समावेश करण्यात आला. रॉबिन्सनचा बदली खेळाडू म्हणून आलेल्या बेसचा इतिहास देखील तसाच आहे. त्याने 2013 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या दरम्यान भारताच्या राष्ट्रगीतावर तसेच महेंद्रसिंह धोनीच्या बॅट बदलण्यावर वादग्रस्त पोस्ट (England Players Racist Comment) केली होती. त्याची पोस्ट व्हायरल होताच बेसने त्याचे सोशल मीडिया अकाऊंट सध्या बंद केले आहे.

हरभजनचा ‘दुसरा’ चेहरा, दहशतवाद्यांच्या उदात्तीकरणानंतरचा माफीनामा फसवा

…तर दक्षिण आफ्रिकेतून भरती करा

ओली रॉबिन्सनला तात्काळ निलंबित करत आपण वर्णद्वेषी शेरेबाजी सहन करणार नाही, असा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न इंग्लंड क्रिकेट बोर्डानं केला आहे. आता त्यानंतर त्यांच्या टीममधील खेळाडूंचे खरे चेहरे उघड होत आहेत. त्यांचा आणि रॉबिन्सनचा अपराध एकच आहे. त्यामुळे त्यांच्यावरही रॉबिन्सनप्रमाणे कारवाई होणार का?  हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने रॉबिन्सन प्रकरणाप्रमाणे आता उघड झालेल्या आणि भविष्यात उघड होतील अशा सर्व खेळाडूंवर कारवाई केली (England Players Racist Comment) तर त्यांना लवकरच दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि अन्य देशातून भरती करावी लागेल. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाचं तात्पुरते नुकसान होईल, पण मानवतेच्या व्यापक कल्याणासाठी इंग्लंड बोर्डाने ते सहन करेल अशी आशा आहे. त्याचबरोबर स्थलांतरित खेळाडूंची एक बॅच घेतली आणि इंग्लंडने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला. आता पुन्हा आणखी एका बॅचची भरती केली तर ते कदाचित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकतील. या वाईटातूनही इंग्लंड क्रिकेटसाठी काही चांगलं घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: