फोटो – ट्विटर, अजिंक्य रहाणे

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियातील टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवून देण्यात अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) कॅप्टनसीचा मोठा वाटा होता. विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीमध्ये अजिंक्यनं काळजीवाहू कॅप्टन म्हणून भारताला 2-1 असा विजय मिळवून दिला.या कामगिरीनंतर अजिंक्यच्या खेळात घसरण झाली आहे. त्याची आता टीम इंडियातील जागा धोक्यात आली आहे. अजिंक्यनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये, ‘ऑस्ट्रेलियातील यशाचं माझं क्रेडिट इतरांनी पळवलं’ असा आरोप केला आहे. शांत स्वभवाच्या अजिंक्यनं केलेल्या या गंभीर आरोपामुळे (Ajinkya Rahane on credit) नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अजिंक्यने काय केले होते ?

ऑस्ट्रेलियामध्ये 2020 साली झालेल्या सीरिजमधील पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया 36 रनवर ऑल आऊट झाली. त्या टेस्टमध्ये मोठ्या पराभवानंतर विराट कोहली (Virat Kohli) कौटुंबिक कारणामुळे मायदेशी परतला. ऑल आऊट 36 असा निचांकी तळ गाठल्यानंतर अजिंक्य पुढील तीन टेस्टमध्ये टीमचा कॅप्टन झाला.

अजिंक्यनं मेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये झुंजार सेंच्युरी झळकावली. त्या सेंच्युरीनं टीम इंडियाची संपूर्ण मनस्थिती बदललेली. भारतीय टीमला जोमानं उसळी मारण्यासाठी अजिंक्यच्या सेंच्युरीनं प्रेरणा दिली. भारताने मेलबर्न टेस्ट जिंकली. सिडनी टेस्ट ड्रॉ केली. त्यानंतर ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व संपवत विजय मिळवला.

अजिंक्यच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं ती सीरिज 2-1 या फरकानं जिंकली. ऑस्ट्रेलियात खेळाडूंना टार्गेट करत होणारे वाद, क्वारंटाईनच्या कठोर नियमांमुळे बदललेली परिस्थिती त्याचबरोबर सतत होणाऱ्या दुखापतींमुळे जखमी वॉर्डासारखी झालेली टीमची अवस्था या सर्व अडचणींवर मात करत, अनेक पहिल्या पसंतीचे खेळाडू उपलब्ध नसूनही अजिंक्यनं त्या सीरिजमध्ये धीराने कॅप्टनसी सांभाळत टीमला सीरिज जिंकून दिली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील हे एक ग्रेटेस्ट कमबॅक (Ajinkya Rahane on credit) आहे.

होय, आपण (तरीही) पुन्हा जिंकलो!

अजिंक्य काय म्हणाला?

अजिंक्यनं ‘बॅक स्टेज विथ बोरिया’ या कार्यक्रमात बोलताना ऑस्ट्रेलिया सीरिजमधील कामगिरीवर पहिल्यांदाच मत व्यक्त केले आहे. ‘मी ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये काय केलं आहे, हे मला माहिती आहे. मला ते कुणाला सांगण्याची गरज नाही. पुढे येऊन क्रेडिट घेण्याचा माझा स्वभाव नाही. ऑन फिल्ड किंवा ड्रेसिंग रूममध्ये मी काही निर्णय घेतले होते. त्याचे क्रेडिट इतरांनी घेतले. माझ्यासाठी ती सीरिज खूप खास होती. ती ऐतिहासिक सीरिज जिंकणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते.’ असे अजिंक्यने (Ajinkya Rahane on credit)  सांगितले.

अजिंक्य यावेळी पुढे म्हणाला, ‘या सीरिजनंतर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यांनी त्याचं क्रेडिट घेतले. त्यांनी जे सांगितलं किंवा मीडियामध्ये हा माझा निर्णय असल्याचा दावा केला तो त्यांचा स्वभाव आहे. मला माझ्या बाजूनं माहिती आहे की मी ऑन फिल्ड काय केलं आहे. होय, मॅनेजमेंटशी देखील चर्चा करत होतो. पण, मला आतील सत्य माहिती होतं. ते बोलणे ऐकून मला हसू येते. माझा बढाई मारण्याचा स्वभाव नाही,’ असेही त्याने यावेळी स्पष्ट (Ajinkya Rahane on credit) केले.

अजिंक्यची जागा धोक्यात

अजिंक्य रहाणेचा फॉर्म ऑस्ट्रेलिया सीरिजनंतर ढासळला आहे. त्याला मागील वर्षभरात एकही सेंच्युरी झळकावता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टेस्ट सीरिजमधील 6 इनिंगमध्ये त्याने फक्त 1 हाफ सेंच्युरी झळकावली आहे. अजिंक्यची व्हाईस कॅप्टनसी यापूर्वीच काढून घेण्यात आली आहे. त्याची टीममधील जागाही श्रीलंका सीरिजमध्ये जाणार असे मानले जात आहे.

अजिंक्य रहाणेची टीममधील हकालपट्टी निश्चित, सौरव गांगुलीने दिले स्पष्ट संकेत

अजिंक्यनं आपले टेस्ट करिअर संपल्याची चर्चा यावेळी फेटाळून लावली. ‘माझं टेस्ट करिअर संपलं असं कुणी म्हंटलं तर मी ते ऐकल्यावर फक्त हसतो. ऑस्ट्रेलियात काय झालं होतं हे सर्वांना माहिती आहे. मी यापूर्वी देखील टेस्ट मॅचमधील विजयात योगदान (Ajinkya Rahane on credit) दिले आहे.  खेळावर प्रेम असलेल्या सर्वांना ही गोष्ट चांगलीच माहिती आहे,’ असा दावा अजिंक्यनं यावेळी केला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: