फोटो – ट्विटर / @ajinkyarahane88

ऑस्ट्रेलिया सीरिज (India Tour Of Australia) जिंकून टीम इंडियाचे (Team India) सर्व खेळाडू गुरुवारी (21 जानेवारी 2021) घरी परतले. या सीरिजमधील टीम इंडियाचा कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) परिवारासाठी हा दिवस विशेष होता. विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या टेस्टनंतर कौटुंबीक कारणामुळे माघारी परतला आणि अजिंक्यनं उर्वरित तीन टेस्टमध्ये कॅप्टनसी केली.

टीम इंडिया ही सीरिज 4-0 नं हरेल असं भाकित अनेक माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट विश्लेषकांनी केलं होतं. टीममधील प्रमुख खेळाडू सतत जखमी होत होते. ब्रिस्बेन टेस्टपूर्वी (Brisbane Test) तर एकाचवेळी तीन प्रमुख बॉलर्स जखमी झाले. या सर्व अडचणींमध्येही अजिंक्य शांत होता.

मेलबर्न टेस्टमध्ये (Melbourne Test) त्यानं सेंच्युरी झळकावत टीमला भक्कम उदाहरण घालून दिलं. त्यानंतर नवख्या मोहम्मद सिराजला मैदानाच्या बाहेर पडताना टीम लीड करण्याचा मान दिला. स्वत: रन आऊट झाल्यानंतर रवींद्र जडेजाचं सांत्वन केलं. सिडनीतील शिवीगाळ प्रकरणातही तो खेळाडूंच्या पाठीशी ठाम उभा राहिला. नव्या खेळाडूंना आधार आणि सीनियर खेळाडूंना स्वातंत्र्य दिलं. त्याचा परिणाम आपण या दौऱ्यात पाहिला. संपूर्ण टीमनं एकजुटीनं खेळ करत ऑस्ट्रेलिया सीरिज 2-1 अशी जिंकली.

( वाचा : IND vs AUS: रहाणेच्या सेंच्युरीमुळे टीम इंडिया मेलबर्न टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ‘अजिंक्य’ )

रहाणेचं जंगी स्वागत

अजिंक्य रहाणेच्या शांत आणि कणखर वृत्तीचा आज सर्व देशाला अभिमान आहे. त्याच्या कुटुंबाला तसंच तो जिथं राहतो, त्या सोसायटीला या सर्वांचा आनंद झाला असणार हे उघडच आहे. त्यामुळे त्या सर्वांनी रहाणेचं जोरदार स्वागत केलं.

अजिंक्य राहतो त्या मुंबईतील माटुंग्याच्या सोसायटीमध्ये त्याच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं होतं. ढोल ताशांच्या गजरात अजिंक्यचं सर्वांनी स्वागत केलं. त्याची संपूर्ण सोसायटी आपल्या लाडक्या अजिंक्यचं स्वागत करण्यासाठी दाराशी उभे होते. अजिंक्यबद्दलचा अभिमान त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

अजिंक्यनं केलं गुपित उघड!

अजिंक्यची लहान मुलगी आर्यानं तिची गळाभेट घेतली. तो मोठा भावनिक क्षण होता. या सर्व स्वागतानं अजिंक्य भारावून गेला. अजिंक्यनं या सत्काराच्या उत्तर देताना, सर्वप्रथम संपूर्ण देशवासियांचे आभार मानले. माझ्यासाठी हा क्षण आनंदाचा आहे. या कामगिरीमागे सर्व देशवासियांचा हात आहे. त्यांच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हतं, असं अजिंक्यनं सांगितलं.

हे सर्व सांगितल्यावर त्यानं नवरा-बायकोमधील एक गुपित सर्वांसमोर उघड केलं. “घरात येताना चांगले कपड़े घालून ये’’, अशी सूचना अजिंक्यला त्याची बायको राधिकानं दिली असल्याचं अजिंक्यनं यावेळी सांगितलं. “चांगले कपडे घातले तर काय फरक पडेल असं विचारलं तेंव्हा, यामुळे आर्याला (अजिंक्यची मुलगी) आनंद होईल, असं राधिकानं सांगितलं, असं अजिंक्य यावेळी म्हणाला.’’ ‘TV9 मराठी’ नं याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अजिंक्य आणि राधिका धोपावकर हे दोघं शाळेतले मित्र आहेत. त्यांचा प्रेमविवाह आहे. त्यांचं लग्न 2014 साली झालं. त्यांना एक मुलगी आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: