फोटो – ट्विटर

टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा राहुल द्रविडचा (Rahul Dravid) शिष्य म्हणून ओळखला जातो. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनामुळे ज्यांचा खेळ बदलला अशा मोठ्या यादीतील अजिंक्य राहणे हे एक बडं नाव आहे. रहाणे सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची (WTC Final) तयारी करत आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये द्रविडने 13 वर्षांपूर्वी दिलेल्या सल्ल्याने त्याचा खेळ कसा बदलला (Rahane On Dravid) याची आठवण सांगितली आहे.

अजिंक्य रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत होता तेव्हाचा हा किस्सा आहे. 2008-09 दुलिप ट्रॉफी फायनलच्या दरम्यान रहाणेची द्रविडची भेट झाली होती. रहाणे तेव्हा पश्चिम विभाग (West Zone) तर द्रविड हा दक्षिण विभाग (South Zone) टीमचा सदस्य होता.

चेन्नईमध्ये झालेल्या त्या मॅचबद्दल रहाणेने सांगितले की, “ मला आठवतंय की त्या दुलिप ट्रॉफी फायनलमध्ये मी 165 आणि 98 रन काढले होते. त्या मॅचनंतर मला राहुल भाईने बोलावले. मी तुझ्याबद्दल खूप वाचलं आहे. तू भरपूर रन काढत आहेस. एक खेळाडू म्हणून तू आता टीम इंडियामध्ये निवड होण्याची अपेक्षा करत असशील. हे अगदी स्वाभाविक आहे. मला तुला इतकंच सांगायचं आहे की, तू जे सध्या करत आहेस तेच करत राहा. भारतीय टीमसाठी आपोआप बोलावणे येईल. त्याच्या मागे धावू नकोस.

राहुल भाई सारख्या व्यक्तीकडून हा सल्ला (Rahane on Dravid) मिळाल्याने मला मोठी प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी पुढच्या सिझनमध्ये पुन्हा एकदा हजार रन काढले आणि दोन वर्षांनी माझी टीम इंडियामध्ये निवड झाली.’’ असे रहाणेने ESPNCricinfo ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

दुर्लक्षित नायक ते ऑस्ट्रेलियातील अद्भुत विजयाचा हिरो

प्रवीण आम्रेंना दिले श्रेय

अजिंक्य रहाणेने यावेळी बोलताना त्याचे मुंबईचे पहिले कोच प्रवीण आम्रे (Pravin Amre) यांनाही श्रेय दिले. रहाणेची फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 48.30 इतकी सरासरी आहे. पण त्याच्या करियरची सुरुवात खराब झाली होती.

पहिल्या काही मॅचमध्ये रहाणे फेल गेला होता. त्यावेळी मला पुन्हा क्लब क्रिकेट खेळण्यासाठी पाठवावं असं काही जणांचं मत होतं. आम्रेंनी मात्र त्यांचं ऐकलं नाही. एखाद्या खेळाडूची टीममध्ये निवड केल्यानंतर त्याला किमान 7-8 मॅच संधी द्यायला हवी, असे आम्रे यांचे मत होते. त्यांच्या पाठिंब्यानंतरच मी खराब सुरुवातीनंतरही टीममध्ये टिकलो आणि नंतर पुढे रन बनवले, असं राहाणेनं सांगितलं.

5 दिवसांमध्ये बदललं पृथ्वी शॉ चं आयुष्य तुम्हीही वाचा एका बदलाची गोष्ट

अजिंक्य रहाणेनं 2011 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रहाणेनं टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन बनवले आहेत. इंग्लंडमधील लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडियाला 29 वर्षांनी मिळालेल्या विजयात रहाणेची सेंच्युरी निर्णयाक ठरली होती. आता न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या फायनलमध्येही रहाणेकडून याच पद्धतीच्या खेळाची भारतीय फॅन्सना अपेक्षा आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: