फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात मेलबर्नमध्ये 26 डिसेंबरपासून सुरु होणारी दुसरी टेस्ट ही ‘बॉक्सिंग डे’ टेस्ट आहे. टेस्ट क्रिकेटमधील ‘बॉक्सिंग डे’ ही एक नियमित प्रथा असून त्याचे आता ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांमध्ये पालन केले जाते. त्यामुळे ‘बॉक्सिंग डे’ चा अर्थ काय? असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे.

‘बॉक्सिंग डे’ नावाचा इतिहास?

ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 डिसेंबरला सुरु होणाऱ्या टेस्टला ‘बॉक्सिंग डे’ टेस्ट असे म्हणतात. या नावाचा बॉक्सिंग या खेळाशी काही संबंध नाही. ख्रिसमसचा आनंद मोठ्या प्रमाणात साजरा करणारी मंडळी, मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बॉक्समधून दरवर्षी वेगवेगळ्या भेटवस्तू देतात. भेटवस्तूंचे ते बॉक्स ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 डिसेंबरला उघडण्याची प्रथा आहे.

ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक देशांमध्ये 25 डिसेंबर ते 1 जानेवारी अशी सुट्टी असते. त्यामुळे सर्वत्र उत्साही आणि आनंदी वातावरण असते. अनेक परिवार या निमित्ताने एकत्र जमतात किंवा पर्यटनासाठी बाहेर जातात. या उत्साही दिवसांचा आनंद साजरा करण्यासाठी ‘बॉक्सिंग डे’ टेस्ट सुरु झाली.

( वाचा : IND vs AUS: ‘बॉक्सिंग डे’ टेस्टच्या सर्वोत्तम खेळाडूला मिळणार एक विशेष पुरस्कार, वाचा काय आहे त्याचे खास कारण )

पहिली ‘बॉक्सिंग डे’ टेस्ट कधी झाली?

‘बॉक्सिंग डे’ टेस्ट म्हंटलं की ऑस्ट्रेलियाचं नाव प्रथम डोळ्यासमोर येते. मात्र पहिली बॉक्सिंग डे टेस्ट ही इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1913  साली खेळली गेली. त्यानंतर 48 वर्षांनी दुसरी टेस्ट खेळण्यात आली.

ऑस्ट्रेलियात 1950-51 साली पहिली ‘बॉक्सिंग डे’ टेस्ट खेळवण्यात आली. त्यानंतर 1953 ते 67 या काळात एकही ‘बॉक्सिंग डे’ टेस्ट झाली नाही. 1980 सालापासून दरवर्षी ऑस्ट्रेलियात बॉक्सिंग डे टेस्ट घेण्यात येते.

( वाचा : वासिम जाफरने अजिंक्य रहाणेला दिलेल्या गूढ संदेशाचा अर्थ माहिती आहे का? )

कुठे होते ‘बॉक्सिंग डे’ टेस्ट?

ऑस्ट्रेलियात मेलबर्नमध्ये ‘बॉक्सिंग डे’ टेस्ट खेळवण्यात येते. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये देखील आता दरवर्षी ‘बॉक्सिंग डे’ टेस्ट होते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: