फोटो – ट्विटर

सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy 2021) शुक्रवारी मुंबई (Mumbai) विरुद्ध हरयणा (Haryana) ही मॅच झाली. ही मॅच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरसाठी (Arjun Tendulkar) महत्त्वाची होती. मुंबईच्या टीमकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची अर्जुनची प्रतीक्षा अखेर संपली.

सचिन, अर्जुन आणि हरयाणा

सचिन तेंडुलकरनं प्रथम श्रेणी स्पर्धेतील शेवटची मॅच 2013-14 साली हरयाणाविरुद्ध खेळली होती. योगायोगाची गोष्ट म्हणजे अर्जुन तेंडुलकरनं हरयाणाविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. सचिनला त्या मॅचमध्ये मोहित शर्मानं (Mohit Sharma) आऊट केला. अर्जुन विरुद्ध खेळलेल्या हरयाणाच्या टीमचा मोहित शर्मा कॅप्टन होता. हा सचिन, अर्जुन आणि हरयाणा या त्रिकोणातला आणखी एक कोन आहे.

अर्जुनसाठी कशी झाली मॅच

या मॅचमध्ये मुंबईची पहिली बॅटिंग होती. अर्जुन शेवटच्या ओव्हरमध्ये ते देखील अकराव्या क्रमांकावर खेळायला आहे. तो तीन बॉल नॉन स्ट्रायकरला होता. तेवढ्यात मुंबईचा शेवटचा बॅट्समन आकाश पारकर आऊट झाला. त्यामुळे अर्जुनला एकही बॉल न खेळता आणि एकही रन न काढता नाबाद शून्यावर परत यावं लागलं.

( वाचा : मोहम्मद अझहरुद्दीननं काढले 54 बॉल्समध्ये 137 रन्स, 11 सिक्स आणि 9 फोरसह केले अनेक रेकॉर्ड्स! )

अर्जुनला बॉलिंगमध्ये फार वाट पाहावी लागली नाही. मुंबईचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) अर्जुनला दुसरीच ओव्हर दिली. पहिल्या ओव्हरमध्ये तो महागडा ठरला. त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये हरयणानं 15 रन काढले. त्यानंतर त्यानं दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर कमबॅक केलं. हरयणाच्या चैतन्य बिश्नोईला त्यानं 4 रनवर आऊट करत प्रथमश्रेणी क्रिकेटमधील पहिल्या विकेटची नोंद केली. या मॅचमध्ये अर्जुनं 4 पैकी 3 ओव्हर बॉलिंग केली. या 3 ओव्हरमध्ये 11.33 च्या इकॉनॉमी रेटनं 34 रन देऊन 1 विकेट घेतली.

मुंबई पुन्हा पराभूत

पहिल्या दोन मॅचमध्ये पराभूत झालेल्या मुंबईला अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाचाही फायदा झाला नाही. हरयणानं सुरुवातीच्या दोन धक्क्यातून सावरत मुंबईचा आठ विकेट्सन पराभव केला. मुंबईचा हा या स्पर्धेतील सलग तिसरा पराभव आहे. आता त्यांच्या साखळी फेरीतील फक्त 2 मॅच शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबईचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलं आहे.

( वाचा : मुंबईकर अजित आगरकरच्या भन्नाट स्पेलपुढे कांगारुंनी पत्कारली होती शरणागती! )

हरयाणाकडून हिमांशू राणानं नाबाद 75 तर शिवम चौहाननं नाबाद 43 रन काढले. त्यापूर्वी जयंत यादवच्या (Jayant Yadav) भेदक माऱ्यापुढे मुंबईची इनिंग 143 रन्सवर संपुष्टात आली. जयंत यादवनं 22 रन देत चार विकेट्स घेतल्या. मुंबईचे कॅप्टन सुर्यकूमार यादवसह सिद्धेश लाड (Siddesh Lad) आणि शिवम दुबे (Shivam Dube) हे मधल्या फळीतील (मिडल ऑर्डर) बॅट्समन शून्यावर आऊट झाले.

सर्फराज खान (Sarfaraz Khan) 30  आणि अथर्व अंकोलकर 37 यांनी प्रतिकार केल्यानं मुंबईला 143 पर्यंत मजल मारता आली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: