फोटो – 9 न्यूज

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील चर्चित अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series 2021-22) आता संपली आहे. या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 4-0 असा पराभव केला. होबार्टमध्ये झालेली शेवटची टेस्ट तर इंग्लंडने फक्त 3 दिवसांमध्ये गमावली.या टेस्टनंतर दोन्ही टीममधील काही खेळाडू अडचणीत सापडले आहेत. होबार्टमधील हॉटेलच्या गच्चीवर दारू पिऊन हे खेळाडू धिंगाणा (Ashes Party in Hobart) घालत होते. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

नेमके काय घडले?

या प्रकरणात सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ सोमवारी सकाळी 6 वाजता शूट करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. होबार्ट टेस्ट संपल्यानंतर रात्रभर काही खेळाडूंनी हॉटेलच्या गच्चीवर दारू पिऊन पार्टी केली. यामध्ये दोन्ही टीमचे खेळाडू सहभागी झाले होते.

ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायन, ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ ट्रेव्हिस हेड, ऑस्ट्रेलियन विकेट किपर अ‍ॅलेक्स कॅरी, इंग्लंडचा कॅप्टन जो रूट (Joe Root) आणि सर्वात अनुभवी फास्ट बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) हे खेळाडू एकत्र हॉटेलच्या गच्चीवर दारू पार्टी (Ashes Party in Hobart)  करत होते.

रात्रभर सुरू असलेल्या या दारू पार्टीचा आवाज वाढल्याने हॉटेलमधील अन्य ग्राहकांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर होबार्ट पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सर्व खेळाडूंना खोलीत जाण्यास सांगितले.

वादात अडकल्यानं करिअर भरकटलं, अन्यथा त्याच्यासारखा कुणीच नव्हता!

जा आणि झोपा!

लायन आणि कॅरी हे ऑस्ट्रेलियन खेळाडू तर टेस्ट मॅचमधील पांढऱ्या कपड्यातच दारू पार्टीमध्ये होते. या बाबतच्या व्हिडीओमध्ये होबार्टमधील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पार्टीमध्ये हस्तक्षेप केल्याचे दिसत आहे.

‘खूप जास्त आवाज आहे. तुम्हाला इथून घालवण्यासाठी आम्हाला बोलवण्यात आले आहे. रूममध्ये जा आणि झोपा थँक्यू’ अशी सूचना महिला अधिकाऱ्यांनी या खेळाडूंना केली. त्यानंतर नॅथन लायन ‘काही हरकत नाही’ असे उत्तर (Ashes Party in Hobart) त्यांना देतो.

ECB करणार चौकशी

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) या प्रकरणाची चौकशी करणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये इंग्लंड टीमचे असिस्टंट कोच ग्रॅहम थोर्पेचा आवाज आहे. पण, त्याचा चेहरा दिसत नाही. यामध्ये थोर्पेने लायन, रूट, कॅरी आणि अँडरसन या खेळाडूंची नावं घेतली आहेत. त्याचबरोबर हा व्हिडीओ वकिलांसाठी शूट करत आहे. उद्या सकाळी भेटू, असेही थोर्पेनं सर्व खेळाडूंना यावेळी सांगितलं.

ECB ने या संपूर्ण प्रकरणाबाबत माफी मागितली असून याबबत संपूर्ण चौकशीनंतच प्रतिक्रिया देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण, थोर्पेने शूट केलेला व्हिडीओ 24 तासांमध्ये व्हायरल (Ashes Party in Hobart) कसा झाला हा प्रश्न मात्र कायम आहे.

Ashes Series: पहिल्याच दिवशी दिसला इंग्लंडचा जुना (Joe) ‘Root’

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: