फोटो – ट्विटर, आयसीसी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) दुसरी टेस्ट अ‍ॅडलेडमध्ये सुरू आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवसानंतर सकाळी बसलेल्या मोठ्या धक्क्यानंतरही ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. या सीरिजमध्ये सलग दुसऱ्या टेस्टमध्ये डेव्हिड वॉर्नरची (David Warner) सेंच्युरी हुकली. सेंच्युरीच्या उंबरठ्यावर आऊट होऊन निराश मनस्थितीमध्ये परतणाऱ्या वॉर्नरनं मनाचा मोठेपणा दाखवला. त्यानं मॅच पाहण्यासाठी आलेल्या एका फॅनला आयुष्यभराची (David Warner Gift) आठवण भेट दिली आहे.

मॅचपूर्वी मोठा धक्का

अ‍ॅडलेडमधील डे-नाईट टेस्ट सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. त्यांचा टेस्ट टीमचा कॅप्टन पॅट कमिन्स (Pat Cummins) या टेस्टमधून आऊट झाला. कमिन्स या टेस्टच्या आदल्या रात्री हॉटेलात जेवायला गेला होता. त्यावेळी तो कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आला.

या कारणामुळे कमिन्सला अ‍ॅडलेड टेस्टमधून बाहेर पडावं लागलं. कमिन्सच्या अनुपस्थितीमध्ये स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची कॅप्टनसी करत आहे. केपटाऊनमध्ये 2018 साली झालेल्या बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर पहिल्यांदाच स्मिथ ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन बनला आहे.

बटलरचा सॉलिड कॅच

स्टीव्ह स्मिथनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याची ही 150 वी टेस्ट आहे. हा टप्पा पूर्ण करणारा तो इंग्लंडचा तिसरा क्रिकेटपटू बनला आहे. ब्रॉडला या टेस्टमध्ये विकेट्स घेण्यासाठी फार काळ थांबावं लागलं नाही.

ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमधील 8 व्या ओव्हरमध्ये त्याने मार्कस हॅरीसला आऊट केले. यावेळी त्याला जोस बटलरची मदत मिळाली. स्लिप आणि विकेट किपर यांच्यामधून वेगानं जाणारा बॉल बटलरने डावीकडे झेपावत सुरेख पकडला. हॅरीसचा खराब फॉर्म या टेस्टमध्येही कायम आहे.

वॉर्नर-लाबुशनेनं सावरलं

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का लवकर बसला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशने (Marnus Labuschange) या जोडीनं ऑस्ट्रेलियाला सावरले. त्यांनी पहिल्या सेशनमध्ये संयमी खेळ करत (David Warner Gift) विकेट वाचवली.

डिनर ब्रेकनंतर त्यांनी रन काढण्यास सुरूवात केली. या जोडीनं त्यांची सहावी शतकी पार्टनरशिप पूर्ण केली. डेव्हिड वॉर्नर चांगलाच सेट झाला होता. ब्रिस्बेन टेस्टमध्ये हुकलेली सेंच्युरी तो पूर्ण करणार असेच दिसत होते. त्यावेळी तो पुन्हा एकदा नर्व्हस नाईन्टीचा (Nervous Ninety) बळी ठरला.

फॅनसाठी आयुष्यभराची आठवण

बेन स्टोक्सच्या बॉलवर कव्हरला खेळण्याच्या प्रयत्नात ब्रॉडकडे कॅच देऊन वॉर्नर आऊट झाला. त्याची सेंच्युरी 5 रनने हुकली. वॉर्नरने याच मैदानात 2019 साली पाकिस्तान विरुद्ध नाबाद 335 रन काढले होते. त्यानंतर तो मागील वर्षी भारताविरुद्ध इथं झालेली टेस्ट खेळला नव्हता. याचाच अर्थ 2017-18 च्या सिझननंतर वॉर्नर पहिल्यांदाच अ‍ॅडलेडमध्ये आऊट झाला.

सलग दुसऱ्या टेस्टमध्ये सेंच्युरी हुकलेला वॉर्नर निराश मनस्थितीमध्ये आऊट होऊन  परतत असताना त्याने मनाचा मोठेपणा दाखवला. वॉर्नरने स्टेडियममध्ये बसलेल्या एका छोट्या फॅनला बॅटींग ग्लोज भेट दिले. वॉर्नरकडून मिळालेली भेट ही या फॅनसाठी आयुष्यभराची आठवण (David Warner Gift) असेल. त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्ट दिसत होता.

वॉर्नर आऊट झाल्यानंतर लाबुशने आणि स्मिथ या जोडीनं अधिक पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 2 आऊट 221 होता. लाबुशने 95 रनवर नाबाद असून स्मिथ 18 रन काढून त्याला साथ देत आहे.

Explained, ऑस्ट्रेलियाला पिंक बॉल टेस्टमध्ये इंग्लंड कसे पराभूत करणार?

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

   

error: