फोटो – ट्विटर, आयसीसी

डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) T20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) दमदार कामगिरीनंतर अ‍ॅशेस सीरिजची (Ashes Series 2021-22) सुरूवात जोरदार केली होती. या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्टमध्ये त्याची सेंच्युरी थोडक्यात हुकली. पण सीरिज संपता-संपता त्याची कामगिरी घसरली आहे. होबार्टमध्ये सुरू असलेल्या शेवटच्या टेस्टमध्ये तर वॉर्नरचे चांगलेच हाल झाले आहेत. त्याच्या नावावर एका लज्जास्पद रेकॉर्डची नोंद (Warner Double Duck Record) झाली आहे.

लज्जास्पद रेकॉर्ड

होबार्ट टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये वॉर्नर 22 बॉलचा सामना करून शून्यावर आऊट झाला होता. त्याला ओली रॉबिन्सनने आऊट केले होते. दुसऱ्या इनिंगमध्ये तर वॉर्नर फक्त 3 बॉल मैदानात टिकला. त्याला यावेळी स्टुअर्ट ब्रॉडने आऊट केले. वॉर्नर दुसऱ्या इनिंगमध्येही शून्यावर आऊट होताच, त्याच्या नावावर या लज्जास्पद रेकॉर्डची नोंद झाली आहे.

एका टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये शून्यावर आऊट होणारा (Warner Double Duck Record) वॉर्नर हा पहिला ऑस्ट्रेलियन ओपनर आहे. यापूर्वी 2019 साली इंग्लंड दौऱ्यातील मँचेस्टर टेस्टमध्ये वॉर्नर दोन्ही इनिंगमध्ये शून्यावर आऊट झाला होता. वॉर्नरनं या सीरिजमधील 8 इनिंगमध्ये 273 रन केले. यामधील 95 आणि 94 रनच्या इनिंग काढल्या तर पुढील 6 इनिंगमध्ये त्याने फक्त 84 रन काढले आहेत.

इंग्लंड पुन्हा गडगडले

होर्बाट टेस्टमध्येही इंग्लंडच्या बॅटींगने निराशा केली. सिडनी टेस्ट ड्रॉ केल्यानंतर इंग्लंडची इनिंग पूर्वपदावर येईल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. दोन टेस्ट बाहेर बसल्यानंतर होबार्टमध्ये परतलेला ओपनर रॉरी बर्न्स शून्यावर आऊट झाला. त्याच्या विकेटनंतर इंग्लंडची घसरगुंडी सुरू झाली.

इंग्लंडच्या एकाही बॅटरला हाफ सेंच्युरी करता आली नाही. आठव्या क्रमांकावर आलेल्या ख्रिस वोक्सनं (Chris Woakes) सर्वात जास्त 36 रन केले. कॅप्टन जो रूटला (Joe Root) 34 रन करता आले. रूटला आजवर ऑस्ट्रेलियात एकही सेंच्युरी झळकावता आलेली नाही. या सीरिजपूर्वी तो जबरदस्त फॉर्मात होता, तरीही त्याची ही इच्छा अपूर्ण आहे. आता दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला या सीरिजमधील शेवटची संधी असेल.

डेव्हिड वॉर्नरनं निराश मनस्थितीतही दाखवलं मोठं मन, फॅनला मिळाली आयुष्यभराची आठवण, VIDEO

दिवसभरात 17 विकेट्स

इंग्लंडची पहिली इनिंग 188 रनवर संपुष्टात आली. ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन पॅट कमिन्सनं (Pat Cummins) सर्वात जास्त 4 विकेट्स घेतल्या. डे-नाईट टेस्ट स्पेशालिस्ट मिचेल स्टार्कनं (Mitchell Starc) 3 विकेट्स देत त्याला भक्कम साथ दिली. पहिल्या इनिंगमध्ये 115 रनची आघाडी घेऊन उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या इनिंगची सुरूवात खराब झाली. दिवसअखेरीस त्यांची अवस्था 3 आऊट 37 अशी (Warner Double Duck Record) होती.

होबार्ट टेस्टच्या दुसऱ्या दिवशी दिवसभरात 17 विकेट्स पडल्या. भारतीय पिचला सतत नावं ठेवणाऱ्या मंडळींनी हा रेकॉर्ड देखील लक्षात ठेवला पाहिजे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: