फोटो – ट्विटर

ऑस्ट्रेलियाने होबार्ट टेस्टमध्ये तीन दिवसांत इंग्लंडचा 146 रनने पराभव केला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series) 4-0 या दणदणीत फरकाने जिंकली आहे. कॅप्टन पॅट कमिन्स (Pat Cummins) कॅप्टनसीमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच टेस्ट सीरिज खेळली. ही सीरिज मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन टीमनं जोरदार सेलिब्रेशन केले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या माजी कॅप्टन टीम पेनच्या भावाने (Tim Paine Brother) क्रिकेट ऑस्ट्रेलियाची (Cricket Australia) जोरदार खरडपट्टी काढली.

का आहे नाराजी?

टीम पेन हा अ‍ॅशेस सीरिज सुरू होईपर्यंत ऑस्ट्रेलिया टीमचा कॅप्टन होता. त्याला एका महिलेला अश्लिल मेसेज केल्याच्या चार वर्ष जुन्या प्रकरणात कॅप्टनपदावरून हटवण्यात आले. त्यानंतर पेननं अ‍ॅशेस सीरिज न खेळण्याचा आणि क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.

पेनच्या गावात म्हणजेच होबार्टमध्ये शेवटची टेस्ट झाली. या संपूर्ण टेस्टच्या कालावधीमध्ये पेनची आठवण ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ ला आली नाही. त्यामुळे टीम पेनचा भाऊ निक पेननं बोर्डावर नाराजी (Tim Paine Brother) व्यक्त केली.  

‘होय, मी मुर्ख ठरलो’, सर्व बाजूनं अडकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनची कबुली!

काय म्हणाला निक?

टीम पेनला कुटुंबीय आणि मित्र मंडळींसमोर निरोप द्यायला हवा होता. या प्रकारचा निरोप मिळणे त्याचा हक्क होता, अशी भावना निकनं व्यक्त केली आहे. ‘त्याला (टीम पेन) त्याच्या होम ग्राऊंडवर कुटुंब, मित्र आणि दीर्घ काळापासून फॅन असलेल्या सर्वांसमोर निरोप मिळायला हवा होताय तो त्याचा हक्क होता. ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. आयुष्यातील एका चुकीमुळे (ज्यामध्ये त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.) त्याची सर्व स्वप्न झाली. पण, अन्य व्यक्तींच्या चुकांकडे दुर्लक्ष केले जाते.  

आपल्याच सदस्यांना पाठिंबा न देणाऱ्या संघटनेचे दुट्टप्पी धोरण आहे. एका स्थानिक खेळाडूचा त्याच्या घरच्या प्रेक्षकांसमोर सन्मान करायला हवा होता. अतिशय दुर्दैवी.’  या शब्दात टीम पेनच्या भावाने (Tim Paine Brother) त्याचा राग व्यक्त केला आहे. 

संकटकाळात कॅप्टन

ऑस्ट्रेलियाची टीम 2018 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होती. त्यावेळी बॉल टेम्परिंग प्रकरणात टीमचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि व्हाईस कॅप्टन डेव्हिड वॉर्नर (David Warner) दोषी आढळले होते. त्यामुळे त्या दोघांवर 1 वर्षांची बंदी घालण्यात आली.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हादरवून सोडणाऱ्या या कालखंडात टीम पेन याला टेस्ट टीमचे कॅप्टन करण्यात आले होते. पेनच्या कॅप्टनसीमध्ये इंग्लंडमध्ये झालेली अ‍ॅशेस सीरिज ऑस्ट्रेलियाने बरोबरीत रोखली होती. मात्र भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये टीमचा 1-2 या फरकाने पराभव झाला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: