फोटो – ट्विटर, विस्डेन

टीम इंडियाप्रमाणेच आपणही ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला धक्का देऊ अशी आशा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या फॅन्सना होती. जो रूट (Joe Root) आणि डेव्हिड मलान (Dawid Malan) यांच्या पार्टनरशिपने ती आशा जागवली होती. तिसऱ्या दिवस संपूर्ण खेळून काढणारी रूट-मलान जोडी चौथ्या दिवशी फक्त 22 बॉल टिकली. त्यानंतर लंचपर्यंत संपूर्ण इंग्लंड टीम ऑल आऊट झाली आणि नंतर ऑस्ट्रेलियाने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. ब्रिस्बेन टेस्ट अवघ्या साडेतीन दिवसांत आणि 9 विकेट्सनं जिंकत ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस सीरिजमध्ये (Ashes Series 2021-22) 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. इंग्लंडच्या या पराभवात त्यांचा दोन वर्षांपासून असलेला बॅटींगचा प्रश्न (England Flop Batting) पुन्हा एकदा ठळक झाला आहे.

ब्रिस्बेन टेस्टमध्ये काय झाले?

इंग्लंडचा कॅप्टन जो रूट याने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. इंग्लंडची दोन वर्षांची परंपरा लक्षात घेऊन हा निर्णय घेणे हे धाडसाचे होते. ते धाडस इंग्लंडच्या अंगाशी आले. त्यांची पहिली इनिंग दोन सेशनमध्ये 147 रनवर ऑल आऊट झाली. इंग्लंडच्या एका बॅटरला पहिल्या इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी करता आली नाही.

इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये जो रूट आणि डेव्हिड मलान या जोडीने प्रतिकार केला. त्यांनी तिसऱ्या विकेट्ससाठी 163 रनची पार्टनरशिप केली. जो रूटने 89 तर डेव्हिड मलानने 82 रन काढले. इंग्लंडच्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी 15 एक्स्ट्रा रनचा हातभार लावला. त्यामुळे उर्वरित 9 बॅटर्सनी मिळून फक्त 111 रन (England Flop Batting) काढले. इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंगमधील 61 टक्के रन हे रूट आणि मलान या दोघांनीच काढले आहेत.

‘आता ते उद्योग बंद करा,’ इंग्लंडच्या कॅप्टनची क्रिकेट बोर्डाकडे मागणी

2 वर्षांपासून डोकेदुखी

इंग्लंडने 2019 पासून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या टेस्ट क्रिकेटमधील बलाढ्य टीमसह न्यूझीलंड या वर्ल्ड चॅम्पियन टीमचाही सामना केला आहे. या टीमविरुद्ध खेळताना इंग्लिश बॅटर्सनी अधिक तयारी करत आणि जास्त निग्रहाने खेळणे अपेक्षित आहे. या काळातील इंग्लिश टीमची सरासरी ही 26.8 इतकी आहे. टेस्ट खेळणाऱ्या टीममध्ये इंग्लंड 8 व्या नंबरला आहे. आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाबे या चार टीमची सरासरी इंग्लंडपेक्षा कमी आहे.

इंग्लंडचा माजी कॅप्टन अ‍ॅलिस्टर कूक रिटायर (Alastair cook) झाल्यापासून इंग्लंडच्या टेस्ट टीमच्या बॅटींगचा सर्व भार हा जो रूटवर आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रूटची सरासरी ही 49. 29 आहे. रूटचे योगदान बाजूला केले तर इंग्लंडची आकडेवारी ही आणखी साधारण (England Flop Batting) होते.

सर्वाधिक शून्य

इंग्लंडच्या बॅटर्सनी या दोन वर्षांमधील 34 टेस्टमध्ये सर्वाधिक 81 वेळा शून्यवार आऊट होण्याचा रेकॉर्ड केला आहे. याचाच अर्थ प्रत्येक टेस्टमध्ये शून्यावर आऊट होण्याची इंग्लिश बॅटर्सची संख्या 2.44 आहे. या यादीत दुसऱ्या नंबरवर असणाऱ्या टीम इंडियाचे बॅटर्स 25 टेस्टमध्ये 51 वेळा शून्यावर आऊट झाले आहेत.

या अ‍ॅशेस सीरिजमधील पहिल्याच बॉलवर (आणि अर्थातच शून्यावर) आऊट झालेला रॉरी बर्न्स हा इंग्लिश ओपनर या वर्षात आजवर 6 वेळा शून्यावर आऊट झाला आहे. डॅन लॉरेन्स, डॉब सिब्ले आणि जॉनी बेअरस्टो हे इंग्लंडच्या टॉप ऑर्डरमधील बॅटर्स प्रत्येकी 4 वेळा शून्यावर परतलेत. इंग्लंडच्या टॉप 7 बॅटर्सनी मिळून या वर्षात आत्तापर्यंत 29 वेळा शून्यावर आऊट होण्याची कामगिरी केली आहे. हा देखील एक रेकॉर्ड (England Flop Batting) आहे.

Ashes Series: पहिल्याच दिवशी दिसला इंग्लंडचा जुना (Joe) ‘Root’

चूका माहिती पण उत्तर कुठे?

इंग्लंडच्या टीमची ही सर्वात मोठी अडचण आहे. त्यांना त्यांच्या चुका माहिती आहेत. पण, अजूनही त्यांना उत्तर सापडलेले नाही. शून्याची मोठी कमाई करणारी त्यांची बॅटींग ऑर्डर ब्रिस्बेनमध्ये दोन दिवस खेळून टेस्ट वाचवेल अशी त्यांना आशा आहे. आजही ते त्याच काही बॅटर्सची आदलाबदली करत ते परिस्थिती बदलतील या आशेवर आहेत.

त्यामुळेच एखादी पार्टनरशिप झाली की त्यांना नवा सूर्य दिसल्याता भास होतो. ती पार्टनरशिप संपली की अजून रात्र अर्धीही सरली नाही, याची जाणीव होते. अ‍ॅशेस सीरिजमधील पहिल्याच टेस्टमध्ये दोन्ही टीमच्या बॅटींगमधील अंतर स्पष्ट झालंय. या पराभवानंतर इंग्लंडच्या फ्लॉप बॅटींगसाठी (England Flop Batting) प्रत्येक टेस्ट मॅच म्हणजे नवा खडतर पेपर असणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: