फोटो- द सन

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs Enngland) यांच्यातील 5 टेस्ट मॅचच्या अ‍ॅशेस सीरिजचा फक्त 11 दिवसांमध्ये निकाल लागला आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या शेवटच्या 6 विकेट्स फक्त 80 मिनिटांमध्ये पडल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियानं एक इनिंग आणि 14 रननं जिंकली. इंग्लंडच्या नामुश्कीदायक पराभवामुळे कॅप्टन जो रूट (Joe Root) हा अनेकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. या पराभवामुळे रूट अ‍ॅशेस सीरिजनंतर कॅप्टनसी सोडण्याच्या विचारात (Joe Root Captaincy) आहे.  

काय आहे निर्णय?

ब्रिटीश वृत्तपत्र ‘द टेलीग्राफ’ ने दिलेल्या वृत्तानुसार रूट अ‍ॅशेस सीरिजनंतर कॅप्टनसीच्या भविष्यावर निर्णय घेणार आहे. त्याने हे पद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) टीमचा नवा कॅप्टन असेल.

अ‍ॅशेस सीरिजमधील दोन टेस्ट अद्याप बाकी आहेत. सिडनी आणि होबार्टमध्ये या टेस्ट होणार आहेत. इंग्लंडचा सध्याचा खराब फॉर्म पाहता ऑस्ट्रेलिया या सीरिजमध्ये 5-0  या फरकानं इंग्लिश टीमला व्हाईट वॉश देईल, असे मानले जात आहे. या मानहानीकारक पराभवानंतर रूटची कॅप्टनसी वाचणे खूप अवघड आहे, त्यामुळेच रूट हकालपट्टी होण्यापूर्वीच बॅटींगवर अधिक फोकस करण्यासाठी कॅप्टनसी सोडण्याच्या (Joe Root Captaincy) विचारात आहे.

Ashes Series: 4 ओव्हर्स 7 रन आणि 6 विकेट, वडील स्टेडियममध्ये येण्यापूर्वीच मुलानं केलं इंग्लंडचं काम तमाम

निराशाजनक कामगिरी

जो रूटच्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या इंग्लंड टीमची 2021 या कॅलेंडर वर्षातील कामगिरी निराशाजनक झाली आहे. या टीमनं या वर्षात एकूण 9 टेस्ट गमावल्या आहेत. जी आजवरची इंग्लंडची सर्वात निराशाजनक कामगिरी आहे. यापूर्वी 2016 साली अ‍ॅलिस्टर कुकच्या कॅप्टनसीमध्ये इंग्लंडने 8 टेस्ट गमावल्या होत्या. या कामगिरीनंतर कुकला कॅप्टनसी सोडावी लागली होती.

अर्थात जो रूटनं बॅटर म्हणून या वर्षात सर्वात चांगली कामगिरी करत 29 इनिंगमध्ये 1708 रन काढले आहेत. तर इंग्लंडच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रॉरी बर्न्सनं फक्त 530 रन केले आहेत. हा फरकच इंग्लंडच्या कामगिरीबद्दल बरचं काही सांगतो. इंग्लंडचे बॅटर्स यावर्षभरात 54 वेळा शून्यावर आऊट झाले आहेत, हा देखील एक इतिहास आहे.

पुढे काय होणार?

आगामी काळात कॅप्टन रूट आणि इंग्लंड टीमचे हेड कोच ख्रिस सिल्व्हरवूड यांच्या कामगिरीचे मुल्यमापन करतील. आगामी काळात इंग्लंडच्या फर्स्ट क्लास क्रिकेटची रचना देखील लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटप्रमाणे करण्याची रूट बोर्डाकडे मागणी (Joe Root Captaincy)  करू शकतो.

इंग्लंडला 2015 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये क्वार्टर फायनल गाठण्यात अपयश आले होते. त्यानंतर इंग्लिश टीमची लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट खेळण्याची रचना बदलण्यात आली. त्याचा फायदा 4 वर्षांनीच टीमला झाला. इंग्लंडने 2019 साली पहिल्यांदाच वन-डे वर्ल्ड कप जिंकला आहे.

Ashes Series: पहिल्याच दिवशी दिसला इंग्लंडचा जुना (Joe) ‘Root’

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: