फोटो – ट्विटर, आयसीसी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये होणाऱ्या पिंक बॉल टेस्टमध्ये (Pink Ball Test) इतिहास हा इंग्लंडच्या विरुद्ध आहे. इंग्लंडला ऑस्ट्रेलियात गेल्या 4 वर्षातील 11 टेस्टमध्ये एकही विजय मिळालेला नाही. त्याचबरोबर डे-नाईट वातावरणात होणाऱ्या पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा रेकॉर्ड शंभर टक्के आहे. या जबरदस्त रेकॉर्डनंतरही इंग्लंडला इतिहास घडवायचा असेल तर काही काही महत्त्वाच्या गोष्टी (How England Win) कराव्या लागतील.

बॉलर्सवर जबाबदारी

जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) हे इंग्लंडचे दोन्ही अनुभवी बॉलर अ‍ॅडलेडमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहेत. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये त्यांना आश्चर्यकारक रित्या बाहेर बसवण्यात आले होते. अँडरसन, ब्रॉड, वोक्स आणि रॉबिन्सन असा तगडा फास्ट बॉलिंग अटॅक इंग्लंडकडे आहे.

फास्ट बॉलिंगला मदत करणाऱ्या डे-नाईट टेस्टच्या वातावरणात इंग्लडच्या अटॅकमध्ये ऑस्ट्रेलियाला स्वस्तात गुंडाळण्याची क्षमता आहे. यापैरी अँडरसनचा अ‍ॅडलेडमधील रेकॉर्ड चांगला आहे. त्याने या ग्राऊंडवर 16 विकेट्स घेतल्या असून यामध्ये मागील पिंक बॉल टेस्टमधील दुसऱ्या इनिंगमध्ये घेतलेल्या 5 विकेट्सचा समावेश आहे. अँडरसनची ही ऑस्ट्रेलियातील शेवटची अ‍ॅशेस सीरिज आहे. या सीरिजमध्ये अँडरसनने आघाडीवर राहात बॉलर्सना प्रेरणा दिली तर यजमानांची डोकदुखी वाढू शकते.

मॅच हातातून निसटताच इंग्रज बिथरले, बुमराहशी केले भांडण

स्टार्कला सांभाळा

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फास्ट बॉलर मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याचा पिंक बॉल टेस्टमधील रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याने सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या तीन ओव्हर्समध्ये विकेट घेण्याची स्टार्कची सवय आहे. ब्रिस्बेन टेस्टमध्येही त्यानं पहिल्याच बॉलवर विकेट घेत इंग्लंडला मागे ढकलले होते. इंग्लिश बॅटर्सना स्टार्कला सांभाळून खेळण्याची गरज आहे.

मिचेल स्टार्कचा विश्वासू जोडीदार जोश हेजलवूड दुखापतीमुळे ही टेस्ट खेळणार नाही. तर कॅप्टन पॅट कमिन्स (Pat Cummins) कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं या टेस्टमधून बाहेर पडला आहे. इंग्लंडला त्याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी स्टार्कला सांभाळून खेळत स्पिनर नॅथन लायनला टार्गेट केले तर ऑस्ट्रेलियन बॉलिंग अटॅकवर दबाव (How England Win) वाढेल.

लाबुशेनची विकेट

मार्नस लाबुशेनची (Marnus Labuschagne) विकेट इंग्लंडसाठी सर्वात महत्त्वाची आहे. त्याची पिंक बॉल टेस्टमधील सरासरी 81.50 आहे. तसेच ब्रिस्बेनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये त्याने फॉर्मात असल्याचे दाखवून दिले होते.

मार्कस हॉरीस फॉर्मात नाही. डेव्हिड वॉर्नरचा फिटनेस संशयास्पद आहे. त्यातच त्याला स्टुअर्ट ब्रॉडचा सामना करावा लागणार आहे. स्टीव्ह स्मिथची पिंक बॉलमधील 41.83 ही सरासरी अ‍ॅशेसमधील त्याच्या ब्रॅडमनच्या दर्जाला साजेशी नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन बॅटींगचा कणा असलेल्या लाबुशेनला झटपट आऊट केले तर इंग्लंडला मोठा फायदा (How England Win)  होणार आहे.

लेग स्पिनर म्हणून आला आणि रन मशीन बनला!

जो रूटचा भार हलका कोण करणार?

इंग्लंडचा कॅप्टन जो रूटची (Joe Root) एका कॅलेंडर वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. ब्रिस्बेनमध्ये पहिल्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट झाल्यानंतर रूटने दुसऱ्या इनिंगमध्ये कमबॅक केले. अ‍ॅडलेड टेस्टपूर्वी जो रूटच्या नावावर या वर्षात 1544 रन आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रॉरी बर्न्सने 492 रन केले आहेत. हा फरक इंग्लंडच्या बॅटींगचा किती मोठा भार रूटने उचलला आहे, हे दाखवण्यासाठी पुरेसा आहे.

जो रूटला साथ देण्यासाठी कोण पुढे येणार हा मोठा प्रश्न आहे. डेव्हिड मलानने मागील काही टेस्टमध्ये आशा दाखवलीय. पण इंग्लिश टीममधील सिनिअर प्लेयर जोस बटलरनं रूटच्या मदतीला येण्याची गरज आहे. बटरलनं या वर्षातील टेस्टमधील 12 इनिंगमध्ये फक्त 1 हाफ सेंच्युरी झळकावली आहे. बटलरनं त्याच्या खास शैलीतून ऑस्ट्रेलियन बॉलर्सवर बॅटनं सुरी फिरवली तर ती इंग्लंडला पिंक बॉल टेस्टमध्ये इतिहास घडवण्याची मोठी संधी (How England Win) असेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.