फोटो – सोशल मीडिया

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) चौथी टेस्ट सिडनीमध्ये सुरू आहे. या टेस्टचा तिसरा दिवस इंग्लंडने केलेल्या प्रतिकारामुळे गाजला. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोनं (Jonny Bairstow) सेंच्युरी झळकावली. इंग्लंडच्या बॅटरकडून या सीरिजमधील ही पहिलीच सेंच्युरी आहे. बेअरस्टोनं आधी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि नंतर मार्क वूड (Mark Wood) सोबत पार्टनरशिप करत इंग्लंडची नामुश्की टाळली. तिसऱ्या दिवसाच्या संपूर्ण खेळात बेन स्टोक्सला मिळालेले जीवदान हा चर्चेचा विषय ठरले. हा सर्व प्रकार पाहून सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) धक्का बसला. सचिनने याबाबत नियम बदलण्याची मागणी (Sachin on Ben Stokes Survial) केली आहे.

नेमके काय घडले?

इंग्लंडच्या इनिंगमधील 31 व्या ओव्हरमध्ये हा सर्व प्रकार घडला. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीन (Cameron Green) ती ओव्हर टाकत होता. त्या ओव्हरमध्ये बेन स्टोक्सनं ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा एक बॉल सोडला. त्यावेळी ऑस्ट्रेलियन टीमनं स्टोक्स LBW असल्याचे अपील केले. मैदानातील अंपायर पॉल रायफल यांनी हे अपील मान्य केले. स्टोक्सला आपण नाबाद असल्याची खात्री होती. त्याने तातडीने या अपीलच्या विरोधात DRS घेत थर्ड अंपायरकडे दाद मागितली.

थर्ड अंपायरने रिप्लेमध्ये व्हिडीओ पाहिला त्यावेळी सर्वजण थक्क झाले. स्टोक्सने सोडून दिलेला बॉल त्याच्या ऑफ स्टंपला लागून गेला. वेगाने बॉल आदळल्यानंतरही स्टंप पडला नाही. त्यामुळे नियमाप्रमाणे स्टोक्सला थर्ड अंपायरने नाबाद जाहीर केले. बेन स्टोक्सनं हा व्हिडीओ पाहून डोक्याला हात लावला. स्टंप पडला नाही हे पाहून ऑस्ट्रेलियन टीमचाही विश्वास बसला नाही. त्यापैकी काहींनी पुढे येऊन स्टंपला हात लावून तपासणी (Sachin on Ben Stokes Survial) केली. 

हा प्रकार घडला तेव्हा स्टोक्स 16 रनवर खेळत होता. त्याने याचा फायदा घेत सीरिजमधील पहिली हाफ सेंच्युरी झळकावली. त्याला 66 रनवर नॅथन लायननं आऊट केले. आऊट होण्यापूर्वी स्टोक्सनं बेअरस्टोसोबत पाचव्या विकेटसाठी 128 रनची पार्टनरशिप केली.

नव्या वर्षात वाढणार इंग्लंडच्या अडचणी, जो रूट सोडणार कॅप्टनसी!

सचिनला धक्का

स्टोक्सला मिळालेल्या या दुर्मिळ जीवदानाची चर्चा क्रिकेट विश्वात दिवसभर होती. सिडनी टेस्टवर लक्ष असलेल्या सचिन तेंडुलकरलाही या निर्णयाचा धक्का बसला. त्याने ट्विट करत याबाबतचे मत (Sachin on Ben Stokes Survial) व्यक्त केले.

बॉल स्टंपला लागला, पण बेल्स पडल्याच नाहीत ‘हिटींग द स्टम्प्स’ हा नियम का करू नये. बॉलर्सनाही न्याय मिळाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न सचिनने विचारला. त्याने या ट्विटमध्ये ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नला (Shane Warne) टॅग करत त्याचे मत विचारले आहे.

इंग्लंडवर संकट कायम

सिडनी टेस्टच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडचा स्कोअर 7 आऊट 258 असा आहे. जॉनी बेअरस्टो 103 रनवर नाबाद आहे. त्यानंतरही इंग्लंडची टीम पहिल्या इनिंगमध्ये अजूनही 158 रनने पिछाडीवर आहे. इंग्लंडवर पराभवाचं संकट अजूनही कायम (Sachin on Ben Stokes Survial) आहे. ही टेस्ट वाचवण्यासाठी टीमला आगामी दोन दिवस खेळ उंचवावा लागणार आहे. अ‍ॅशेस सीरिजमधील पहिल्या तीन टेस्टमध्ये पराभूत होत इंग्लंडने सीरिज यापूर्वीच गमावली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: