फोटो – ट्विटर, विस्डेन क्रिकेट

अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series 2021-22) पहिल्या तीन टेस्टमध्ये लोंटागण घातल्यानंतर इंग्लंडने अखेर सिडनीमध्ये लढण्याची जिद्द दाखवली. इंग्लंडच्या तळाच्या बॅटरनी शेवटच्या 10 ओव्हर्स प्रतिकार केला. त्यामुळे या सीरिजमधील इंग्लंडसाठीचा सर्वोत्तम निकाल सिडनीमध्ये लागला. सिडनी टेस्ट (Sydney Test Draw) ड्रॉ झाली. इंग्लंडने त्याचबरोबर सीरिजमध्ये व्हाईटवॉशची नामुश्की टाळण्यातही यश मिळवले.

शेवटच्या सेशनचा थरार

सिडनी टेस्टच्या शेवटच्या सेशनमध्ये दोन्ही टीममध्ये जोरदार लढत झाली. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने (Pat Cummins) जोस बटलर आणि मार्क वूड यांना 3 बॉलच्या अंतराने आऊट करत इंग्लंडला दबावात आणले. त्यानंतर स्कॉट बोलंडने (Scoot Boland) पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावणाऱ्या जॉनी बेअरस्टोला आऊट करत इंग्लंडला आठवा धक्का दिला.

बेअरस्टो आऊट झाला तेव्हा 10 पेक्षा जास्त ओव्हर्स शिल्लक होत्या. ऑस्ट्रेलियन टीम विजयाच्या उंबरठ्यावर होती. त्यांना सिडनीमध्ये जिंकण्यासाठी 2 विकेट्सची गरज होती. त्यावेळी हेंडिग्ले टेस्टचा हिरो जॅक लीच (Jack Leach)  पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या मार्गात भिंत म्हणून उभा (Sydney Test Draw) राहिला.

बॉलर बॅटने लढले

लीच आणि स्टुअर्ट ब्रॉड हे इंग्लंडचे बॉलर त्यांच्या ओपनिंग बॅटरपेक्षा अधिक निग्रहाने खेळत होते. त्यांनी शेवटच्या तासामधील 52 बॉल खेळून काढले. ही जोडी फोडण्यासाठी कॅप्टन कमिन्सने सर्व फिल्डर जवळ बोलावले. बॅटला लागलेला कोणताही बॉल घेण्यासाठी बॉलर आणि विकेट किपरसह 10 फिल्डर बॅटरच्या अगदी जवळ उभे होते.

पॅट कमिन्सने शेवटच्या ओव्हर्समध्ये स्पिनर्सचा वापर केला. याच मैदानात यापूर्वी मायकल क्लार्कच्या स्पिन बॉलिंगनं भारताविरुद्ध शेवटच्या ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाला विजय मिळाला होता. ती आठवण त्याच्या मनात ताजी असावी.

रिकी पॉन्टिंगच्या Spirit of Cricket ला कमिन्सचा ठेंगा, इंग्लिश बॉलरची रोखली hat-trick

5 वर्षांचा दुष्काळ संपला

पॅट कमिन्सने मॅच संपण्यासाठी 3 ओव्हर शिल्लक असताना स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) बॉलिंग दिली. स्मिथनं जॅक लीचला आऊट करत ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. लीच मॅचमधील सर्वात कसोटीच्या प्रसंगी 77 मिनिटे मैदानात उभा होता. त्याने 26 रन काढले.

स्मिथला 2016 नंतर टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच विकेट मिळाली. लीच आऊट झाल्यानंतर जेम्स अँडरसन हा इंग्लंडचा 11 व्या क्रमांकाचा बॅटर मैदानात आला. त्यावेळी 2 ओव्हर्सचा खेळ शिल्लक होता.

अखेर टेस्ट ड्रॉ

लीचची विकेट घेणाऱ्या स्मिथवरच कमिन्सने शेवटच्या ओव्हरची जबाबदारी सोपवली. जेम्स अँडरसनला आऊट करण्याचा स्मिथने जोरदार प्रयत्न केला. शेवटच्या बॉलपर्यंत ऑस्ट्रेलियन टीम विजयाच्या दरवाज्यात होती. पण तो दरवाजा अँडरसनने उघडू दिला नाही. अँडरसनने 6 बॉल खेळून काढत टेस्ट ड्रॉ (Sydney Test Draw) केली.

अ‍ॅशेस सीरिजच्या निकालावर सिडनी टेस्टच्या निकालाचा कोणताही परिणाम होणार नाही. ऑस्ट्रेलियाने सीरिजमध्ये यापूर्वीच 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading