सौजन्य- ट्विटर

भारत विरूद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील क्रिकेट मॅचची प्रत्येक फॅनना उत्सुकता असते. या दोन टीम गेल्या काही वर्षांपासून द्विपक्षीय सीरिज खेळत नाहीत. मागच्यावर्षी झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) दोन्ही टीम एकमेकांच्या विरूद्ध खेळल्या आहेत. आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच त्या मॅचमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियावर विजय मिळवला. आता यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2021) 23 ऑक्टोबर रोजी दोन्ही टीम एकमेकांच्या विरूद्ध खेळणार आहेत. कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीमला पाकिस्तानचा वचपा काढण्यासाठी वर्ल्ड कपपर्यंत थांबण्याची गरज नाही. श्रीलंकेत या वर्षी आशिया कप स्पर्धा (Asia Cup 2022 date announced) होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाला पाकिस्तानला लोळवण्याची पूर्ण संधी आहे.

कधी होणार स्पर्धा?

T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या साधारण एक महिना आधी दोन्ही देश आशिया कप स्पर्धेत एकमेकांच्या विरूद्ध खेळतील. एशियन क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीत या स्पर्धेच्या आयोजनावर शिक्कामोर्तब (Asia cup 2022 date announced) करण्यात आले. ही स्पर्धा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल आणि सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालेल.

आशिया कपच्या आयोजनाबद्दल सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांना या निर्णयामुळे पूर्णविराम मिळाला आहे. अशिया कपचे आयोजन 2020 साली श्रीलंकेत होणार होते, त्यावेळी कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे ही स्पर्धा एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. 2021 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही.

नियोजित वेळापत्रकानुसार 2022 साली पाकिस्तानमध्ये ही स्पर्धा होणार होती. पाकिस्तान आता 2023 साली होणाऱ्या आशिया कपचा यजमान असेल. यावर्षी ही स्पर्धा T20 फॉर्मेटमध्ये खेळवण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. 27 ऑगस्टपासून आशिया कप स्पर्धेला सुरूवात (Asia cup 2022 date announced) होणार आहे.

कोणत्या टीम होणार सहभागी?

आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या ट्विटर अकाउंट वरून स्पर्धेच्या आयोजनाच्या तारखेविषयी माहिती घोषणा करण्यात आली आहेय. यावर्षी 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा होईल. 20 ऑगस्टपासून क्वलिफायर मॅचेस खेळवल्या जातील.

सहा टीम्स सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत टेस्ट क्रिकेटचा दर्जा मिळालेल्या पाच टीम आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या त्या पाच टीम असून या सर्व टीम स्पर्धेसाठी थेट क्वालिफाय झाल्या आहेत. सहाव्या टीमचा समावेश क्वालिफाय मॅचेसनंतर निश्चित येईल.

भारत सर्वाधिक वेळा विजेता

आशिया कपचे आयोजन पहिल्यांदा 1984 साली संयुक्त अरब आमिराती येथे करण्यात आले होते. त्यानंतर आत्तापर्यंत 15 वेळा आशिया कप स्पर्धा भरविण्यात आली. आशिया कपचा इतिहासात भारताने सर्वाधिक 7 वेळा जेतेपद पटकावले आहे. आशिया कपची ट्रॉफी सध्या भारताकडेच आहे. शेवटचा(2018) आशिया कप भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकला होता.

टीम इंडियाचा जगभरातील धडाका पाहून पाकिस्तानी म्हणतात, जहां हमारे सपने…

जय शहा यांच्या कार्यकाळात वाढ

बीसीसीआय सचिव जय शहा यांची आशियाई क्रिकेट काऊन्सिलचा (ACC)अध्यक्षपदी एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत या विषयावर सर्व सहमतीने निर्णय घेण्यात आला आहे. एसीसीने ट्विटर अकाऊंटवरून याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: