फोटो – ट्विटर, आयसीसी

ऑस्ट्रेलियन टीम 24 वर्षांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर (Australia tour of Pakistan) आली आहे. या दौऱ्यातील तीन टेस्टच्या सीरिजचा त्यांनी जोरदार शेवट केला. लाहोरमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 115 रननं पराभव (Australia Won Lahore Test) केला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियानं तीन टेस्टची सीरिज 1-0 या फरकानं जिंकली. पाकिस्ताननं सीरिजच्या पहिल्या दिवसापासूनच डेड पिचचा वापर करत पराभव टाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी दोन टेस्ट डेड पिचच्या जीवावर ड्रॉ केल्या. लाहोरमधील पिचनं बाबर आझमच्या (Babar Azam) टीमला साथ दिली नाही.

पाकिस्तानची फजिती

ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सनं (Pat Cummins) सकारात्मक क्रिकेट खेळत चौथ्या दिवशी इनिंग घोषित केली. ऑस्ट्रेलियानं 121 ओव्हर्समध्ये 351 रनचं टार्गेट पाकिस्तानला दिलं. लाहोरच्या पिचवर चौथ्या इनिंगमध्ये इतके मोठे टार्गेट कधीही यशस्वी पूर्ण झाले नव्हते. हा आजवरचा इतिहास होता. इतिहास बदलता येतो, हे पाकिस्तानच्या टीमला माहितीच नव्हते. त्यांना कदाचित आपण इतिहास करू शकणार नाही, याची खात्री असावी. त्यामुळे त्यांनी मॅच जिंकण्याचे प्रयत्न केलेच नाहीत.

ऑस्ट्रेलियन ऑफ स्पिन नॅथन लायननं (Nathan Layon) चौथ्या इनिंगमध्ये 5 विकेट्स घेत टीमच्या विजयात (Australia Won Lahore Test) मोठा वाटा उचलला. पाकिस्तानचे साजिद खान आणि नौमान अली हे स्पिनर्स घरच्या पिचवर फेल ठरले. त्याचवेळी 24 वर्षांनी पाकिस्तानात पाऊल ठेवलेल्या लायननं निम्मी टीम आऊट करत पाकिस्तानची चौथी इनिंग 235 रनवर संपुष्टात आणली.

PAK vs AUS: पाकिस्तानातील दहशत उघड, टीका करताना कॉमेंटेटरची वळली बोबडी, पाहा Live Video

मर्यादा उघड

पॅट कमिन्सनं इनिंग घोषित करताना घाई केली का? ऑस्ट्रेलियाला डावपेच अंगलट येणार का? असे प्रश्न चौथ्या दिवसाच्या खेळानंतर निर्माण झाले होते. पाचव्या दिवशी कमिन्सचा निर्णय बरोबर होता हे सिद्ध झाले. पाकिस्तानी बॅटर्सच्या मर्यादा उघड झाल्या. पाचव्या दिवशी सकाळच्या सेशनमध्ये पाकिस्ताननं 2 विकेट्स गमावल्या. त्यावेळी ही टेस्ट ड्रॉ होणार असे वाटत होते.

लंचनंतर ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी कमबॅक केले. लायननं पिचवर चिकटून बसलेल्या इमाम-उल हकला आऊट केले. इमामनं 199 बॉलमध्ये 70 रन काढले. फवाद आलम पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला स्टार्कनं नाही तर कमिन्सनं आऊट केलं इतकाच फरक होता. त्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांच्याकडून पाकिस्तानी फॅन्सना पुन्हा एकदा कराचीसारखा खेळ अपेक्षित होता. कराचीमध्या नाबाद सेंच्युरी करणारा रिझवान फक्त 6 बॉल टिकला. त्याला एकही रन करता आला नाही.

बाबर आझमनं हाफ सेंच्युरी झळकावली. त्यानं टीमचा पराभव टाळला नाही. तो 55 रन काढून आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट्स घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सनं दुसऱ्या इनिंगमध्येही 3 विकेट्स घेतल्या. कमिन्सला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देण्यात आला. तर उस्मान ख्वाजा ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ ठरला.

ऑस्ट्रेलिया ऑन टॉप

ऑस्ट्रेलियानं 1998 साली पाकिस्तानमध्ये झालेली टेस्ट सीरिज 1-0 अशी जिंकली होती. 24 वर्षांनी पुन्हा एकदा त्यांनी तो रेकॉर्ड कायम ठेवला आहे. ऑस्ट्रेलियानं 2016 नंतर पहिल्यांदाच देशाच्या बाहेर टेस्ट सीरिज जिंकलीय. त्याचबरोबर आशिया खंडात सीरिज जिंकण्याचा 11 वर्षांचा दुष्काळ संपवला.

स्टार्क-कमिन्सचा धुमाकूळ, 20 रनमध्ये पाकिस्ताननं गमवाल्या 7 विकेट्स!

ऑस्ट्रेलियाची संपूर्ण टीम पाकिस्तानात पहिल्यांदा खेळत होती. बाबर आझमला या नव्या टीमचा पराभव करता आला नाही. घरच्या मैदानात पाकिस्ताननं मॅच जिंकण्यासाठी नाही तर ड्रॉ करण्यासाठी पिच बनवल्या. कराचीमध्ये विजय शक्य असूनही सेट झालेल्या बाबरने त्यासाठी प्रयत्न केले नाहीत. मॅच ड्रॉ करण्यात आनंद मानला. रावळपिंडीच्या पिचवर तर आसीसीनं ताशेरे ओढले. त्यानंतर लाहोरमध्ये पाकिस्तानचा मोठा पराभव झाला. नकारात्मक मानसिकतेमधून खेळणाऱ्या टीमनं सीरिज गमावली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: