फोटो – ट्विटर

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (Pakistan Cricket Board) गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया सीरिजचे वेध लागले आहेत. तब्बल 24 वर्षांनी ऑस्ट्रेलियाची टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार आहे. मार्च महिन्यात या सीरिजला सुरूवात होईल. यापूर्वी न्यूझीलंडनं टॉस सुरू होण्याच्या काही तास आधी पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता. आता ऑस्ट्रेलियाचा संभाव्य दौरा देखील संकटात आला आहे. ऑस्ट्रेलियन प्लेयर पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार (Australia Player refuse to tour) देतील, असा दावा ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जोश हेजलवूडनं केला आहे.

काय आहे कारण?

प्रचंड प्रयत्नानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) पाकिस्तानात मुख्य टीम पाठवण्यास तयार झालं आहे. यापूर्वी 1998 साली ऑस्ट्रेलियन टीमनं पाकिस्तानचा दौरा केला होता. 24 वर्षांनी होणाऱ्या या पाकिस्तान दौऱ्याबाबत ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये उत्साहापेक्षा भीतीचं वातावरण जास्त आहे.

हेजलवूडने ‘क्रिकेट डॉट कॉम एयू’ या ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या वेबसाईटला बोलताना सांगितले की, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया पाकिस्तान दौऱ्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. पण तरीही काही जणांनी या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला तर मला आश्चर्य वाटणार नाही. प्रत्येक खेळाडूला त्याचे कुटुंब आहे. ते त्यांच्याशी याबाबत चर्चा करतील. त्यांना कुटंबाचा विचार केलाच पाहिजे. कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर खेळाडूंनी नाही म्हटंल तर आपण त्यांच्या निर्णयाचा आदर (Australia Player refuse to tour)  करायला हवा.’

दौऱ्याचे वेळापत्रक काय?

ऑस्ट्रेलियानं मार्क टेलरच्या कॅप्टनसीमध्ये पाकिस्तानात शेवटचा दौरा केला होता. 1998 साली झालेली ती सीरिज ऑस्ट्रेलियानं 1-0 नं जिंकली होती. त्यानंतर 2002 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वी पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. त्यामुळे ती सीरिज कोलंबो आणि यूएईमध्ये घ्यावी लागली. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हा दौरा करण्यास मान्यता दिली होती.

ऑस्ट्रेलियन टीम या दौऱ्यात 3 टेस्ट, 3 वन-डे आणि 1 T20 मॅच खेळणार आहे. 3 मार्च ते 25 मार्च दरम्यान टेस्ट सीरिज होईल. पाकिस्तानातील कराची, रावळपिंडी आणि लाहोरमध्ये या टेस्ट मॅच होतील. तर व्हाईट बॉल क्रिकेटची सीरिज 29 मार्च ते 5 एप्रिलच्या दरम्यान लाहोरमध्ये होणार आहे.

पाकिस्तानात खेळण्याची कुणाची तयारी का नसते?, PCB च्या CEO ने दिली मोठी कबुली

पाकिस्तानात जाण्य़ाची भीती का?

श्रीलंकेच्या क्रिकेट टीमवर 2009 साली लाहोरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला आजही क्रिकेट विश्व विसरलेलं नाही. या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक वर्ष पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होते. अगदी मागच्या वर्षी देखील न्यूझीलंडनं सुरक्षेचं कारण देत पाकिस्तानचा दौरा पहिली मॅच सुरू होण्याच्या काही तास आधी रद्द केला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या विनंतीनंतरही न्यूझीलंडची टीम पाकिस्तानमध्ये थांबली नव्हती.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबीयांना या सर्व गोष्टी माहिती आहेत. त्यामुळेच पाकिस्तानात पाऊल ठेवणे त्यांना धोकादायक वाटत (Australia Player refuse to tour) आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: