फोटो, सोशल मीडिया, प्राईम व्हिडीओ

बांगलादेशीची टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर (Bangladesh Tour of New Zealand) आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपअंतर्गत (WTC) टेस्ट मॅच सुरू आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सिझनचे विजेतेपद जिंकणाऱ्या न्यूझीलंडला नवव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशनं चकीत केले आहे. या टेस्टच्या चौथ्या दिवसाच्या अखेरीस बांगलादेशनं आघाडी घेतली. पण, त्यांनी घेतलेलेला एक रिव्ह्यू हा क्रिकेट विश्वातील सर्वात खराब रिव्ह्यू (Worst Review Ever) आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

असा Review असतो?

मैदानातील अंपायरने घेतलेल्या निर्णयावर आक्षेप असेल तर थर्ड अंपायरकडे दाद मागण्यासाठी रिव्ह्यूचा पर्याय दोन्ही टीमना दिलेला आहे. हे रिव्ह्यू मर्यादीत असल्याने त्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. अनेकदा अंपायरनं घेतलेल्या एखाद्या जवळच्या निर्णयाला (Close decision) खेळाडू थर्ड अंपायरकडे दाद मागतात. त्यावेळी त्यांचा निर्णय चुकला तर समजू शकतो.

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (Bangladesh vs New Zealand) यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये बांगलादेशनं घेतलेला रिव्ह्यू पाहिल्यावर कुणीही डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही. टस्कीन अहमदच्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. अहमदनं टाकलेला यॉर्कर बॉल रॉस टेलरनं (Ross Taylor) पाया जवळ बॅटने अडवला. त्यावर बांगलादेशनं रिव्ह्यू घेतला.

थर्ड अंपायरने रिप्लेमध्ये बॉल बघितला तेव्हा बॉल बॅटवर लागलेला स्पष्टपणे दिसत होते. बांगलादेशनचा हा अजब रिव्ह्यू पाहून कॉमेंटेटर देखील चकित झाले. सोशल मीडियावरही हा सर्व प्रकार व्हायरल (Worst Review Ever) झाला आहे.

पहिल्या टेस्टमध्ये वरचढ

बांगलादेश टीमला न्यूझीलंडमध्ये टेस्ट मॅच जिंकण्याची ऐतिहासिक संधी आहे. न्यूझीलंडनं पहिल्या इनिंगमध्ये 328 रन केले होते. त्याला उत्तर देताना बांगलादेशनं पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 458 रन केले. बांगलादेशनं पहिल्या इनिंगमध्ये 130 रनची आघाडी घेतली. यावेळी  बांगलादेशच्या टीमनं 176.2  ओव्हर्स बॅटींग केली. हा देखील बांगलादेशी रेकॉर्ड आहे. यापूर्वी त्यांनी 2013 साली श्रीलंकेविरुद्ध 196 ओव्हर्स बॅटींग केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच बांगलादेशनं 150 पेक्षा जास्त ओव्हर्स बॅटींग केली आहे.

भर मैदानात सहकाऱ्याला मारणार होता ‘हा’ बांगलादेशी! पाहा VIDEO

न्यूझीलंडची दुसऱ्या इनिंगमध्येही अवस्था बिकट आहे. चौथ्या दिवसाच्या अखेरी न्यूझीलंडचे 5 आऊट 147 रन झाले आहेत. न्यूझीलंडकडे आता 17 रनची आघाडी आहे. शेवटची टेस्ट सीरिज खेळणारा रॉस टेलर मैदानात असून तो पाचव्या दिवशी अन्य सहाकाऱ्यांना घेऊन किती प्रतिकार करतो त्यावर मॅचचं भवितव्य (Worst Review Ever) अवलंबून असेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: