फोटो – द क्रिकेटर

भारतीय क्रिकेटसाठी 2007 चा वर्ल्ड कप (Cricket World Cup 2007) ही एक वाईट आठवण आहे. राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्वाखाली टीम इंडिया मोठ्या अपेक्षेनं बांगलादेशमध्ये गेली होती. दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेली भारतीय टीम ही वर्ल्ड कप विजेतेपदाची प्रबळ दावेदार होती. मात्र त्यावेळी टीम इंडियाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध झालेल्या धक्कादायक पराभवामुळे भारताचे आव्हन साखळी फेरीतच संपुष्टात आले. दुबळ्या बांगलादेशकडून पराभूत झाल्यानं भारताची मोठी नामुश्की झाली होती. भारताची जगासमोर लाज काढण्यात तमिम इक्बाल (Tamim Iqbal) याचा मोठा वाटा होता. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट अधिक काळ खेळण्यासाठी एका प्रकारातून रिटायर होण्याचा विचार करत आहे.

का होणार रिटायर?

तमिम इक्बाल मागच्याच महिन्यात 32 वर्षांचा झाला आहे. बांगलादेशच्या वन-डे टीमचा सध्या कॅप्टन असलेला तमिम गेल्या 14 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. हे करियर आणखी पाच ते सहा वर्ष वाढवण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठी एका प्रकारातून रिटायर होण्याचा विचार तमिम करत आहे.

‘मला आणखी चार ते पाच वर्ष क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मी खेळेन असं वाटत नाही. ते शक्य नाही. मला माझ्यासाठी महत्त्वाचे असलेल्या दोन फॉरमॅटची निवड करावी लागेल. त्या प्रकारात मी टीमसाठी महत्त्वाचा असेल. मी हा निर्णय कदाचित लगेच घेईन किंवा सहा महिन्यांनी घेईल. कदाचित मी दोन फॉरमॅट खेळणार नाही, फक्त एक फॉरमॅट खेळेल,’ असं तमिमनं एका यूट्यूब चॅनलशी बोलताना सांगितले.

( भर मैदानात सहकाऱ्याला मारणार होता ‘हा’ बांगलादेशी! पाहा व्हिडीओ )

‘मी माझा निर्णय लगेच जाहीर करणार नाही. पण मी हा आणखी लाबंवणार नाही याचं आश्वासन देतो. मला आंतरराष्ट्रीय करियर लांबवायचं असेल तर मला कोणत्या तरी गोष्टीचा त्याग केला पाहिजे. माझ्या करियरसाठी आणि टीमसाठी योग्य असा निर्णय मी घेणार आहे. मी कठोर निर्णय घेण्यासाठी कधीही घाबरत नाही, असंही तमिम (Tamim Iqbal) यावेळी म्हणाला.

कसं आहे तमिमचं करियर?

तमिमनं आजवर 62 टेस्टमध्ये 4508, 213 वन-डे मध्ये 7452, तर 78 आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 1758 रन काढले आहेत. यामध्ये 23 सेंच्युरी आणि 85 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.

तमिमनं (Tamim Iqbal)  2007 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पाचव्या वन-डेमध्ये त्यानं भारताविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. वर्ल्ड कप 2007 मधील त्या मॅचमध्ये भारताची टीम फक्त 191 रनवर ऑल आऊट झाली. त्यानंतर त्याने 53 बॉलमध्ये 51 रनची खेळी करत बांगलादेशच्या विजयात मोठे योगदान दिले होते. बांगलादेशचे क्रिकेट फॅन गेल्या 14 वर्षांपासून हा विजय मिरवत आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: