बांगलादेशचे क्रिकेटपटू मैदानात असतात तेव्हा खेळाडूंना उद्देशून शिवीगाळ, नागीन डान्स, अंपायरचा निर्णय आवडला नाही म्हणून स्टंप काढणे किंवा विरोधी टीमच्या खेळाडूवर वीट फेकून मारणे हे प्रकार आजवर घडलेले आहेत. बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात हरारेमध्ये सुरू असलेली एकमेव टेस्ट देखील याला अपवाद नाही. या टेस्टमध्येही बांगलादेशचा बॅट्समन आणि झिम्बाब्वेचा बॉलर (Bangladesh Zimbabwe Clash) यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

जोरदार कमबॅक

हरारे टेस्टमध्ये टॉस जिंकून बॅटींगला उतरलेल्या बांगलादेशी सुरुवात खराब झाली होती. पहिल्या दिवशी त्यांची अवस्था 6 आऊट 132 अशी बिकट होती. त्यावेळी लिंटन दास (Linton Das) आणि महमदुल्लाह (Mahmudullah) यांनी टीमला सावरले. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 138 रनची पार्टरनरशिप केली. लिंटन दासची सेंच्युरी फक्त पाच रननं हुकली. या पार्टरनरशिपमुळे पहिल्या दिवसअखेर बांगलादेशनं 8 आऊट 294 पर्यंत मजल मारली होती.

दुसऱ्या दिवशीही आक्रमक खेळ

पहिल्या दिवसअखेर नाबाद असलेल्या महमदुल्लाह आणि तस्कीन अहमद (Taskin Ahmed) या जोडीनं दुसऱ्या दिवशी आक्रमक खेळ केला. त्यांनी वेगाने रन जमवले. या दोघांनी नवव्या विकेटसाठी 191 रनची पार्टरनरशिप केली.

आठव्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या महमदुल्लाहनं सर्वाधिक 150 रन काढले. तो अखेरपर्यंत नॉट आऊट होता. तर तस्कीन अहमदन 75 रन काढत त्याला चांगली साथ दिली.

भर मैदानात सहकाऱ्याला मारणार होता ‘हा’ बांगलादेशी! पाहा व्हिडीओ

चांगल्या खेळात राडा

बांगलादेशच्या बॅट्समननं केलेल्या या चांगल्या खेळात 85 व्या ओव्हरमध्ये गालबोट लागलं. झिम्बाबेचा बॉलर मुजरबानी (Muzarabani) ती ओव्हर टाकत होता. त्या ओव्हरमध्ये तस्कीन अहमदनं मागे सरकत त्याचा बॉल डिफेंड केला. तो बॉल खेळून काढल्यानंतर त्याने पिचवरच काही डान्स स्टेप दाखवल्या.

अहमदचा हा डान्स मुजरबानीला आवडला नाही. तो लगेच त्याच्या दिशेनं चालत गेला. त्यावेळी दोघांमध्ये भर मैदानातच बाचाबाची (Bangladesh Zimbabwe Clash)  झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

बांगलादेशनं पहिल्या इनिंमध्ये 468 पर्यंत मजल मारली. 6 आऊट 132 आणि 8 आऊट 270 वरुन ही मजल मारणे नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र या चांगल्या खेळाला पुन्हा एकदा बांगलादेशी खेळाडूंनी त्यांच्या वर्तनानं गालबोट (Bangladesh Zimbabwe Clash) लावलं आहे.

सर्वशक्तीमान व्यक्तीला आव्हान देणारा धाडसी क्रिकेटपटू

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: