फोटो, ट्विटर, एएनआय

टीम इंडियाचा विकेट किपर वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha)  मुलाखत न दिल्याबद्दल धमकी देणारा पत्रकार बोरिया मजूमदारवर (Boria Majumdar) 2 वर्षांची बंदी (BCCI Ban Journalist) घालण्यात आली आहे. बीसीसीआयच्या विशेष समितीनं हा निर्णय जाहीर केला आहे. साहाने फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणात ट्विट करत आपल्याला पत्रकारानं धमकी दिल्याचा स्क्रीन शॉट शेअर केला होता. या ट्विटचे भारतीय क्रिकेटमध्ये जोरदार पडसाद उमटले होते.

नेमकं काय झालं?

वृद्धीमान साहानं 19 फेब्रुवारी रोजी ट्विट करत व्हॉट्सअप चॅटवरील स्क्रीन शॉट शेअर केला होता. ‘भारतीय क्रिकेटसाठी इतकं काही केल्यानंतर एका सन्मानीय पत्रकाराकडून मला हे ऐकावं लागत आहे. भारतीय पत्रकारितेची वाटचाल कोणत्या दिशेनं सुरू आहे, हे सांगण्यासाठी हे पुरेसं आहे.’

साहानं या ट्विटमध्ये कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. पण, त्याच्या ट्विटची माजी खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात दखल घेतली. वीरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री यांनी त्या पत्रकाराचं नाव साहानं जाहीर करावं अशी मागणी केली. हे प्रकरण चांगलंच तापल्याचं लक्षात येताच बीसीसीआयनं तीन सदस्यीय विशेष समितीची स्थापना केली.

या समितीमध्ये बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरूण धूमल आणि प्रभतेज सिंह भाटिया यांचा समावेश होता. या समितीसमोर साहानं मजमुदारचं नाव घेतलं. त्यानंतर त्याचा या प्रकरणातील सहभाग सिद्ध झाल्यानं त्याच्यावर दोन वर्षांची बंदी (BCCI Ban Journalist) घालण्यात आली आहे.

कारवाईचा परिणाम काय?

या बंदीच्या कालावधीमध्ये बोरियाला कोणत्याही क्रिकेट मॅचसाठी मीडिया मान्यता (Media Accreditation) मिळणार नाही. देशातील कोणत्याही नोंदणीकृत क्रिकेटपटूची त्याला मुलाखत घेता येणार नाही. तसंच या क्रिकेटपटूला त्याला भेटताही येणार नाही. त्याचबरोबर त्याला देशातील कोणत्याही क्रिकेट स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार नाही. त्याचबरोबर बीसीसीआयच आणि राज्य क्रिकेट संघटनेच्या कोणत्याही अधिकाऱ्याशी त्याला बोलता येणार नाही.

टीम इंडियाचा विकेटकिपर वृद्धिमान साहाचा द्रविड-गांगुलीवर गंभीर आरोप, क्रिकेट विश्वात खळबळ

बोरियानं फेटाळले आरोप

बोरिया मजमुदारनं यापूर्वी या प्रकरणातील सर्व आरोप फेटाळले होते. तसंच वृद्धीमान साहावर मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. माझा साहाशी झालेल्या संभाषणाचा स्क्रीन शॉट चुकीच्या पद्धतीनं सादर करण्यात आला. आपण त्याला कोणतीही धमकी दिली नव्हती. या प्रकरणात बीसीसीआयच्या सदस्यांना ईमेल करत आपण सर्व घटनाक्रम कळविला असल्याचा दावा बोरियानं केला होता. पण, त्याचा हा दावा फेटाळत बीसीसीआयनं त्याच्यावर 2 वर्षींची बंदी (BCCI Ban Journalist) घातली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

  

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading