फोटो – ANI

काश्मीर प्रीमियर लीगच्या (Kashmir Premier League) मुद्यावर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) पाकिस्तानला चांगलाच हिसका दिला आहे. गेल्या 70 वर्षात संयुक्त राष्ट्रासंह जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणे आणि तिथे तोंडावर आपटणे ही पाकिस्तानची सवय आहे. आता क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानचं बीसीसीआयनं थोबाड फोडलं आहे.

काय आहे प्रकरण?

जम्मू काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानच्या अनधिकृतरित्या ताब्यात आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) या भागावर पाकिस्तान सरकारकडून अनेक निर्बंध आहेत. तेथील नागरिकांच्या हक्काची नेहमी गळचेपी केली जाते. याचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. आता अचानक या भागाचा क्रिकेटसाठी वापर करण्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) ठरवले. पीसीबीनं काश्मीर प्रीमियर लीग (Kashmir Premier League) या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पीसीबीचे संरक्षक हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आहेत. याचाच अर्थ या स्पर्धेचं कारस्थान पाकिस्तान सरकारचं आहे.

मुझ्झफराबाद या पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील शहरामध्ये ही स्पर्धा ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होणार आहे. या स्पर्धेत सहा टीम सहभागी होतील. या स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंसह जगभरातील क्रिकेटपटू खेळणार असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.

हर्षल गिब्जची बोंब

मॅच फिक्सिंग (Match Fixing) प्रकरणाची चौकशी टाळण्यासाठी कित्येक वर्ष भारतामध्ये येणं टाळणारा दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन हर्षल गिब्ज (Herschelle Gibbs) याने या प्रकरणात सर्व प्रथम बोंब ठोकली. बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप गिब्जनं केला आहे.

काश्मीर प्रीमियर लीग स्पर्धेत आपण सहभागी झालो तर क्रिकेट संदर्भातील कोणत्याही गोष्टीसाठी मला भारतामध्ये येऊ दिलं जाणार नाही, अशी धमकी आपल्याला दिली असल्याचा दावा गिब्जनं केला आहे. विशेष म्हणजे काश्मीर प्रीमियर लीग (Kashmir Premier League) ही स्पर्धा म्हणजेच राजकारण असूनही गिब्जनं या ट्विटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंधांचाही उल्लेख करत त्यामुळे आपल्याला त्रास होत असल्याचा आरडाओरडा केला आहे.

भारतविरोधी विखार भरलेला क्रिकेटपटू कमी, गुंड जास्त

गिब्जला पाकिस्तानची साथ

हर्षल गिब्जनं हे ट्विट करताच तात्काळ पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) या विषयावर त्याच्या मदतीला धावून आलं आहे. पीसीबीनं या विषयावर पत्रक प्रसिद्ध केलंय. त्यामध्ये बीसीसीआय आयसीसीचे सदस्य देशांच्या खेळाडूंना धमकावत आहे. बीसीसीआयचे हे वर्तन आम्ही सहन करणार नाही. हा विषय आयसीसीकडं उपस्थित करु, असा कांगावा करण्यात आलाय.

Well Done BCCI

हर्षल गिब्ज आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं चोख उत्तर दिलं आहे. ‘मॅच फिक्सिंग प्रकरणातील आरोपी असलेल्या माजी क्रिकेटपटूनं केलेल्या आरोपात किती तथ्य आहे, हे आम्ही सांगणार नाही. पण, बीसीसीआयला आपल्या देशाच्या हद्दीमध्ये होणाऱ्या क्रिकेटबाबत ठरवण्याचे पूर्ण अधिकार आहेत. हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं लक्षात ठेवावं.

काश्मीर प्रीमियर लीगच्या निमित्तानं (Kashmir Premier League) पाकिस्तान क्रिकेट बोर्ड विनाकारण हस्तक्षेप करत आहे. हा भारताचा अंतर्गत विषय आहे. पीसीबीनं मुद्दा खुशाल आयसीसीकडं न्यावा पाकिस्तानातील कायद्यानुसार तेथील पंतप्रधान हे पीसीबीचे संरक्षक आहेत. त्यामुळे या सर्वाच्या मागे कोण आहे हे लक्षात येते.

शाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली, काश्मीरला स्वतंत्र करण्याची केली भाषा!

या स्पर्धेत रिटायर झालेले क्रिकेटपटू खेळणार आहेत. त्यामुळे हे अधिकृत क्रिकेट होत नाही. या प्रकारच्या क्रिकेटला दिलेली परवानगी ही वादग्रस्तच असेल.’ असं चोख उत्तर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं या विषयावर ANI या वृत्तसंस्थेला बोलताना दिले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: