फोटो – ICC

टीम इंडियाचा (Team India) माजी कॅप्टन आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. गांगुलीला शनिवारी (2 जानेवारी 2020) सौम्य हार्ट अटॅक आल्यानं कोलकाताच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये (Woodlands Hospital) दाखल करण्यात आलं होतं.

बाहेर पडल्यावर काय म्हणाला दादा?

सौरव गांगुलीच्या उत्तम तब्येतीसाठी संपूर्ण देश गेल्या काही दिवसांपासून प्रार्थना करत होता. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर दादानं त्याच्या फॅन्सशी संवाद साधला. “मी हॉस्पिटलमध्ये माझ्यावर इलाज करणाऱ्या डॉक्टरांना धन्यवाद देतो. मी आता ठीक आहे. हॉस्पिटलमध्ये आलो तेंव्हा माझी तब्येत नाजूक होती. डॉक्टरांनी मला नवं आयुष्य दिलं आहे. ज्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मी आता लवकरच विमानानं प्रवास करु शकेल.” ही गांगुलीची हॉस्पिटलच्या बाहेर पडल्यावर पहिली प्रतिक्रिया होती.

गांगुलीनं हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स आणि नर्स यांचे विशेष आभार मानले. त्याचबरोबर हॉस्पिटलच्या बाहेर जमलेल्या असंख्य फॅन्सना हात उंचावून अभिवादन केलं.

हॉस्पिटलची प्रतिक्रिया काय?

सौरव गांगुलीवर गेल्या पाच दिवसांपासून उपचार करणाऱ्या वुडलँड हॉस्पिटलनंही प्रतिक्रिया दिली आहे. ‘दादाला आमची गरज होती, तेंव्हा आम्ही त्याची मदत केली. त्याच्या अपेक्षांची पूर्तता करु शकलो, याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे,’’ असं हॉस्पिटलच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

‘गांगुलीचं ऱ्हदय 20 वर्षांच्या मुलासारखं’

देशातील प्रसिद्ध हार्ट स्पेशालिस्ट डॉ. देवी शेट्टी यांनी मंगळवारी वुडलँड हॉस्पिटलला भेट दिली होती. यावेळी त्यांनी गांगुलीच्या तब्येतीची पाहणी केली. तसेच त्याच्यावर उपचार करणाऱ्या 13 डॉक्टरांच्या टीमशी चर्चा केली. यावेळी त्यांनी “ गांगुली लवकरच बरा होईल. त्याचं ऱ्हदय हे 20 वर्षाच्या मुलासारखं उत्तम काम करत आहे,’’ असा विश्वास व्यक्त केला होता.

( वाचा : सौरव गांगुलीला कशामुळे आला होता अटॅक, पुढचे उपचार काय होणार?, वाचा दादाच्या तब्येतीचे सर्व अपडेट्स )

“हा मोठा हार्ट अटॅक नव्हता. यामुळे गांगुलीच्या ऱ्हदयाचं मोठं नुकसान झालेलं नाही. भविष्यात त्याच्या आयुष्यावर मोठा परिणाम होणार नाही. तो लवकरच सामान्य आयुष्य जगू शकेल.’’ असंही शेट्टी यांनी सांगितलं आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: