
भारताचा (Team India) माजी कॅप्टन आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) शनिवारी (2 जानेवारी 2021) हार्ट अटॅक आला होता. आता गांगुलीची तब्येत स्थिर आहे. भारताचा यशस्वी कॅप्टन असलेला ‘दादा लवकर बरा होऊ दे’ अशी सर्व देश सध्या प्रार्थना करत आहे. भारतीय क्रिकेट हेच लाईफ मिशन असलेल्या ‘गांगुलीला अटॅक कसा काय आला?’ याची सर्वांना चुटपूट लागली आहे.
गांगुलीला नेमकं काय झालं?
गांगुलीला शनिवारी सकाळी घरातील ट्रेड मिलवर व्यायाम करताना त्रास झाला होता. त्यानंतर त्याला कोलकाताच्या वूडलँड हॉस्पिटलमध्ये (Woodland Hospital) दाखल करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांच्या तपासामध्ये त्याला सौम्य हार्ट अटॅक येऊन गेल्याचं निष्पन्न झालं. गांगुलीची शनिवारी प्राथमिक अँजिओप्लास्टी (Angioplasty ) करण्यात आली.
वुडलँड हॉस्पिटलचे डॉक्टर सरोज मंडल यांनी दिलेल्या माहिनुसार, ‘प्राथमिक अँजिओप्लास्टीमध्ये रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज काढण्यात येतात. गांगुलीच्या रक्तवाहिन्यांमध्ये तीन ब्लॉकेज झाले होते. त्यापैकी एक रक्तवाहिनी 90 टक्के ब्लॉक होती. ऱ्हदयाकडे जाणारा रक्तपुरवठा नीट होण्यासाठी हे उपचार केले जातात. आता गांगुलीला स्टेंट द्याचा की नाही याचा निर्णय त्याची तब्येतीची स्थिती पाहून घेतला जाणार आहे.’
( वाचा : सौरव गांगुलीची तब्येत स्थिर, राज्यपाल आणि ममता बॅनर्जींनी घेतली हॉस्पिटलमध्ये भेट )
किती दिवस हॉस्पिटलमध्ये राहणार?
सौरव गांगुलीची प्रकृती सध्या स्थिर असली तरी त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांचं विशेष पथक त्याच्या तब्येतीमधील सर्व बदलांवर लक्ष ठेवून आहे. गांगुलीला आणखी तीन ते चार दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागणार आहे. गांगुलीचं लवकरच आणखी एक अँजिओप्लास्टी ऑपरेशन करण्यात येणार आहे. हे ऑपरेशन कधी करायचं याचा निर्णय डॉक्टर घेतील. शनिवारी रात्री त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. आनंदाची बातमी म्हणजे त्याचा कोरोना रिपोर्ट हा निगेटीव्ह आला आहे.
गांगुलीला अटॅक का आला?
मेडिकलच्या भाषेत सांगायचं तर गांगुलीला एक्यूट मायोकार्डियल इन्फारक्शन (AMI) आहे. सामान्य भाषेत याला हार्ट अटॅक असं म्हणतात. ऱ्हदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी झाल्यानंतर स्नायूंवर ताण येतो आणि त्याचा परिणाम अटॅकमध्ये होतो. यावेळी छातीमध्ये अस्वस्थ वाटू लागतं. ऱ्हदयाच्या एखाद्या भागाला कमी रक्त मिळाल्याचं हे लक्षण आहे गांगुलीच्या परिवारालाही हार्ट अटॅकचा इतिहास आहे.
हॉस्पिटलमध्ये वेळीच उपचार झाल्यानं गांगुलीची तब्येत स्थिर आहे. त्याचबरोबर तो उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला आणखी एक महिना घरी आराम करण्याची आवश्यकता आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.