
टीम इंडियाचा (Team India) माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष (BCCI) सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) प्रकृती स्थिर आहे. गांगुलीला शनिवारी दुपारी सौम्य हार्ट अटॅक आल्यानं कोलकात्याच्या वूडलँड हॉस्पिटलमध्ये (Woodland Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्याच दिवशी त्याच्यावर प्राथमिक अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. गांगुलीच्या शरिरातील रक्तवाहिन्यांमध्ये तीन ब्लॉक आढळले होते.
कधी होणार पुढचं ऑपरेशन?
वूडलँड्स हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली बसू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गांगुलीवर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी करणं आवश्यक आहे. त्याची तब्येत सध्या स्थिर आहे. त्यामुळे हे ऑपरेशन काही दिवसांसाठी पुढं ढकलण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. गांगुलीच्या तब्येतीवर देखरेख ठेवण्यासाठी नऊ डॉक्टरांचं विशेष पथक नेमण्यात आलंय. या पथकानं एकमतानं हा निर्णय घेतला आहे.
( वाचा : सौरव गांगुलीला कशामुळे आला होता अटॅक, पुढचे उपचार काय होणार?, वाचा दादाच्या तब्येतीचे सर्व अपडेट्स )
कधी मिळणार डिस्चार्ज?
सौरव गांगुलीच्या तब्येतीबाबत जगभरातील अन्य डॉक्टरांचीही मदत घेतली जात आहे. सोमवारी मेडिकल बोर्डाच्या झालेल्या बैठकीत प्रसिद्ध ऱ्हदयरोग तज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी तसंच डॉ. आर.के पांडा हे व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. त्यानंतर डॉ. शेट्टी यांनी मंगळवारी हॉस्पिटलला भेट देऊन दादाच्या तब्येतीची पाहणी केली. गांगुलीला बुधवारी डिस्चार्ज मिळणार आहे. गांगुली घरी देखील डॉक्टरांचं पथक त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवणार आहे.
उपराष्ट्रपतींनी केली चौकशी, जय शहांनी घेतली भेट
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी सकाळी फोनवरुन गांगुलीच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचबरोबर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि BCCI चे सचिव जय शहा यांनी कोलकात्याच्या हॉस्पिटलमध्ये जावून त्याची भेट घेतली. ‘दादा, देशाचा हिरो आहे. त्यानं अनेक चढ-उतार पाहिले आहेत. प्रतिस्पर्ध्यांना हरवलं आहे, यंदाही तो असेच करेल,’ असा विश्वास ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.