फोटो – कलकत्ता टाईम्स

2021 या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी संपूर्ण देशाच्या काळाजाचा ठोका चुकवणारी बातमी आहे. टीम इंडियाचा (Team India) माजी कॅप्टन, बीसीसीआयचा (BCCI) सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुलीला (Sourav Ganguly)  सौम्य हार्ट अटॅक आल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गांगुलीची तब्येत स्थिर असून त्याचं अँजिओप्लास्टीचं ऑपरेशन झालं आहे. त्याच्या ऱ्हदयात दोन ब्लॉकेज आढळले आहेत, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर अफताब खान यांनी दिली आहे. गांगुलीवर कोलकात्याच्या वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये (Woodlands Hospital) उपचार सुरु आहेत.

ट्रेडमिलवर आला अटॅक

गांगुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गांगुलीला शुक्रवारी (1 जानेवारी) रात्रीपासूनच बरं वाटत नव्हतं. शनिवारी (2जानेवारी) सकाळी त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ट्रेडमिलवर व्यायाम करत होता. त्यावेळी त्याच्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि चक्कर आली. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमघ्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये सर्व तपासाणी झाल्यानंतर त्याला सौम्य अटॅक येऊन गेल्याचं निदान झाले.’

राज्यपाल, मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वूडलँड हॉस्पिटलमध्ये जावून गांगुलीची विचारपूस केली. तसंच त्याच्यावर होत असलेल्या उपचारांचा आढावा घेतला. यापूर्वी बॅनर्जी यांनी दुपारी ट्विट करत ‘गांगुली लवकर बरा होऊ दे’ अशी प्रार्थना केली होती.

बंगालचे राज्यपाल जगदीश धनकर यांनीही हॉस्पिटलमध्ये जावून गांगुलीची भेट घेतली. ‘मी गांगुलीलो भेटलो. तो चांगल्या मुडमध्ये होता. त्याला भेटल्यावर मला बरं वाटलं’. असं धनखड यांनी सांगितलं.

अमित शहांनी केला डोना गांगुलीला फोन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सौरव गांगुलीची पत्नी डोना (Dona Ganguly) यांना फोन करुन गांगुलीच्या प्रकृतीची विचारपूस केली. केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनीही डोना यांना फोन करुन तब्येतीचे अपडेट्स जाणून घेतले.

‘दादा लवकर बरा हो’

सौरव गांगुलीची त्याच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये झुंजार खेळाडू म्हणून ओळख होती. सध्या तो BCCI चं अध्यक्षपद देखील त्याच तडफेनं सांभाळत आहे. कोरोना व्हायरसच्या काळात तब्येतीची पर्वा न करता गांगुलीनं BCCI च्या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला. युएईमध्ये आयपीएल स्पर्धा (IPL 2020) यशस्वीपणे पार पडण्यात गांगुलीचं मोठं योगदान आहे. लढाऊ वृत्ती हा नैसर्गिक स्वभाव असलेला दादा लवकर बरा होऊ दे, अशी ‘Cricket मराठी’ प्रार्थना करत आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: