भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेची रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धा या सिझनमध्ये रद्द करण्याचा निर्णय BCCI नं घेतला आहे. रणजी ट्रॉफीच्या ऐवजी वन-डे मॅचची विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) आणि महिलांच्या वन-डे मॅचची स्पर्धा होणार आहे. त्यानंतर 19 वर्षांखालील गटाची (Under 19) विनू मंकड स्पर्धेचं (Vinoo Mankad Trophy U19)  आयोजन केलं जाणार आहे.

BCCI सचिव जय शहा (Jay Shah) यांनी सर्व क्रिकेट संघटनांना याबाबत पत्र लिहून या निर्णयाची माहिती दिली आहे. राज्य संघटनांचा फिडबॅक आणि कोरोना व्हायरस महामारी यामुळे BCCI नं हा निर्णय घेतल्याचं शहा यांनी या पत्रात स्पष्ट केलं.

( वाचा : SMAT: कार्तिकची धमाकेदार खेळी, तामिळनाडूची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक )

शहा यांच्या पत्रात काय?

‘या महामारीनं आपल्या सर्वांची परीक्षा घेतली आहे. आयुष्याचा कोणताही भाग यापासून बचावला नाही. आपण आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सुरु करण्यासाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे.

क्रिकेट कॅलेंडरमधील बराच वेळ वाया गेला आहे. या परिस्थितीमध्ये आम्ही वन-डे स्पर्धा खेळवण्यासाठी कटीबद्ध आहोत. त्यामुळे महिला (वरीष्ठ गट वन-डे ट्रॉफी) पुरुष (विजय हजारे ट्रॉफी) आणि अंडर 19 विनू मंकड ट्रॉफी या तीन स्पर्धा घेण्यासाठी BCCI सज्ज आहे,’ असं शहा यांनी या पत्रात स्पष्ट केलं आहे.

( वाचा : IPL 2021: मुंबई इंडियन्सला प्रभावित करणारा नागालँडचा 16 वर्षांचा बॉलर, पाहा VIDEO )

रणजी की विजय हजारे ट्रॉफी यापैकी कोणती स्पर्धा घ्यावी याबाबत BCCI नं यापूर्वी सर्व संघटनांना पत्र लिहून मत विचारलं होतं. त्यावेळी बहुतेक संघटनांनी विजय हजारे ट्रॉफीला पसंती दिली होती.

कधी होणार विजय हजारे ट्रॉफी?

विजय हजारे ट्रॉफीचं वेळापत्रक हे पुढील आठवड्यात जाहीर होईल. सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेप्रमाणेच (Syed Mushtaq Ali Trophy 2021) ही स्पर्धा देखील सहा प्रमुख शहरांमध्ये खेळवली जाईल. या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होताच सर्व खेळाडू बायो बबलमध्ये दाखल होतील.

विजय हजारे स्पर्धा साधरण महिनाभर होणार आहे. आयपीएल स्पर्धा (IPL 2021) मार्च महिन्याच्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता असून त्या स्पर्धेच्या पुरेशी आधी विजय हजारे ट्रॉफी संपेल.

( वाचा : IPL 2021: चेन्नईत 18 फेब्रुवारीला होणार मिनी ऑक्शन, वाचा कोणत्या टीममध्ये किती जागा शिल्लक? )

पहिल्यांदाच रणजी स्पर्धा रद्द

रणजी ट्रॉफीच्या काळात मॅच फी म्हणून खेळाडूंना जवळपास 45 हजार रुपये दर दिवशी मिळते. या सर्व खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय BCCI नं घेतला आहे.

रणजी ट्रॉफीची (Ranji Trophy) सुरुवात 1934-35 साली झाली. पहिल्या वर्षी ही स्पर्धा मुंबईनं (Mumbai) जिंकली होती. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जास्त विजेतेपदं ही मुंबईनं पटाकावली आहेत. सौराष्ट्रानं यापूर्वी शेवटच्या झालेल्या (2019-20) स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.   

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: