फोटो – ट्विटर /ICC

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची (India Tour of England) घोषणा होऊन आता आठवडा उलटला आहे. या 20 सदस्यीय टीममध्ये भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) का नाही? यावर अजूनही चर्चा सुरु आहे. भुवनेश्वरची निवड न होण्याचं कारण काही जण त्याचा फिटनेस असल्याचं सांगत होते. त्यातच शनिवारी (15 मे 2021) आलेल्या एका बातमीनं क्रिकेट विश्व ढवळून निघालं. भुवनेश्वर कुमारला आता टेस्ट क्रिकेटपासून दूर राहयचं आहे आणि फक्त T20 क्रिकेट खेळायचं आहे, असं या बातमीत सूत्रांच्या आधारे सांगितलं होत. या बातमीवर (Bhuvneshwar Kumar On Media) भुवनेश्वर कुमारनं नाराजी व्यक्त केली आहे.

बातमीत काय होतं?

एका इंग्रजी वृत्तपत्रात सूत्रांच्या आधारे दिलेल्या या बातमीमध्ये म्हंटले होते की, ‘भुवनेश्वर कुमारमध्ये आता टेस्ट क्रिकेट खेळण्याचा उत्साह शिल्लक नाही. तो सर्व फोकस लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये देणार आहे. भुवनेश्वरला जवळून ओळखणाऱ्या लोकांच्या मते एक बॉलर म्हणून त्यानं त्याच्या ट्रेनिंगमध्ये बदल केला आहे. आता तो जिममध्ये जास्त वजनही उचलत नाही.

लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये कमी बॉलिंग करुन तो समाधानी आहे. त्याला टेस्ट क्रिकेटमधील मोठे स्पेल नको वाटतात. या सर्व कारणांमुळे त्यानं आता टेस्ट क्रिकेटपासून दीर राहण्याचा निर्णय घेतला आहे.’

World Test Championship आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर, ‘या’ दिग्गजांना वगळलं

 भुवनेश्वरनं दिलं उत्तर

इंग्रजी वृत्तपत्रामध्ये आलेल्या या बातमीचं (Bhuvneshwar Kumar On Media) भुवनेश्वर कुमारनं ट्विट करुन उत्तर दिलं आहे. “मला टेस्ट क्रिकेट खेळण्याची इच्छा नाही, अशा अर्थाचे काही लेख प्रसिद्ध झाले आहे. मी इतकंच सांगू इच्छितो की मी स्वत: ला तीन्ही प्रकारासाठी सज्ज ठेवलं आहे. माझी निवड होवो अथवा न होवो मी हे करत राहीन. सूचना – प्लीज, तुमच्या कल्पना सूत्रांच्या आधारे लिहू नका.’

भुवनेश्वरचा टेस्ट क्रिकेटमधील रेकॉर्ड

भुवनेश्वर कुमारनं 2013 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं मागील आठ वर्षांमध्ये फक्त 21 टेस्ट खेळल्या असून यामध्ये 63 विकेट्स घेतल्या आहेत. तो शेवटची टेस्ट 2018 साली जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध खेळला आहे.

भुवनेश्वर कुमार, स्विंगच्या राजाला दुखापतींचा शह!

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याला दुखापतींचा सतत फटका बसला आहे. अगदी मागच्या महिन्यात झालेल्या आयपीएल स्पर्धेतही (IPL 2021) तो दुखापतींमध्ये काही मॅच खेळू शकला नाही.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: