फोटो – ट्विटर

ऑस्ट्रेलियातील (Australia) देशांतर्गत T20 लीग स्पर्धा असलेल्या बिग बॅश लीग (Big Bash League) ला सुरुवात झालीय. पहिल्या मॅचमध्ये होबार्ट हुरिकेन्सनं (Hobart Hurricanes) ने गतविजेत्या सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) चा 16 रन्सनं पराभव केला. टिम डेव्हिड (Tim David) ची आक्रमक हाफ सेंच्युरी आणि अनुभवी जेम्स फॉकनर (James Faulkner) ची कंजूष बॉलिंग हे होबार्टच्या विजयाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं.

पहिल्यांदा बॅटिंगला आलेल्या होबार्टची सुरुवात खराब झाली. विल जॅक्स शून्यावर आऊट झाला. डर्सी शॉर्टचा खराब फॉर्म बिग बॅशमध्ये देखील सुरु आहे. त्यानं खेळलेल्या पहिल्याच बॉलमध्ये आऊट झाल्यानं होबार्टची दुसऱ्याच ओव्हरमध्ये 2 आऊट 4 अशी बिकट अवस्था झाली होती.

अनुभवी इंग्रामनं सावरलं

त्यानंतर अनुभवी कॉलीन इंग्रामनं होबार्टचा कॅप्टन पीटर हँड्सकाँबसोबत इनिंग सावरली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 55 रन्सची पार्टरनरशिप केली. दुसऱ्या बाजूनं विकेट पडत असताना इंग्रामनं हाफ सेंच्युरी झळकावली. त्याने 55 रन्स काढले. टीम हेडनं 33 बॉलमध्ये 58 रन्सची आक्रमक खेळी केली. हेडच्या या फटकेबाजीमुळेच होबार्टला सिडनी समोर 179 रन्सचं टार्गेट ठेवता आलं.

सिडनीचा ओपनर जोश फिलिपे लवकर परतला. त्यानंतर जेम्स विन्स आणि जॅक एडवर्डसने दुसऱ्या विकेटसाठी 116 रन्सची पार्टरनरशिप केली. त्यांच्या या आक्रमक खेळामुळे सिडनीनं दहा ओव्हरनंतर जास्त होबार्टपेक्षा जास्त स्कोअर केल्यानं एक बोनस पॉईंट मिळवला.

सिडनीला बोनस पॉईंट

सिडनी आरामात मॅच जिंकेल असं वाटत असताना आधी विन्स आणि नंतर चार बॉलच्याच अंतरानं एडवर्ड परतला. सेट बॅट्समन आऊट झाल्यानं होबार्टनं मॅचमध्ये कमबॅक केलं. त्यांच्या बॉलर्सनं मॅचवरील पकड निसटू दिली नाही.

होबार्टचं कमबॅक

अनुभवी जेम्स फॉकनरनं टिच्चून मारा करत 22 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. सिडनीच्या अन्य बॅट्समन्सना वेगानं रन्स करण्यात अपयश आलं. त्यामुळे होबार्टनं बिग बॅश 2020-21 सिझनमधील पहिली मॅच 16 रन्सनं जिंकली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: