फोटो – ट्विटर/क्रिकेट ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सीरिजमधला ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) चा फॉर्म बिग बॅश लीग (Big Bash League) मध्ये देखील कायम आहे. मॅक्सवेलची कॅप्टन्स इनिंग आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) बॉलर नॅथन कुल्टर नाईल (Nathan Colter-Nile) चा भेदक मारा यामुळे मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) ने पहिली मॅच 6 विकेट्सनं आरामात जिंकली आहे.

कुल्टर नाईल चमकला

मेलबर्न स्टार्सचा कॅप्टन ग्लेन मॅक्सवेलनं टॉस जिंकत ब्रिस्बेन हिटला (Brisbane Heat) बॅटिंगचं आमंत्रण दिलं. कुल्टर नाईलचा भेदक मारा हे मेलबर्नच्या इनिंगचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. त्यानं 4 ओव्हर्समध्ये फक्त दोन विकेट्स घेत त्याच्या करियरमधील सर्वोत्तम प्रदर्शन केलं. त्याचबरोबर दोघांना रन आऊट करत ब्रिस्बेनच्या इनिंगला ब्रेक लावला.

ब्रिस्बेनला कॅप्टन ख्रिस लेनकडून मोठी आशा होती. लिन स्थिरावला आहे, असं वाटत असतानाच 20 रन काढून आऊट झाला. ब्रिस्बेनकडून टॉम कूपरनं सर्वात जास्त 26 रन्स काढले. कोणत्याही बॅट्समनला मोठा खेळ करण्यात अपयश आल्यानं ब्रिस्बेनला फक्त 126 रन्सचं टार्गेट ठेवता आलं.

‘द मॅक्सवेल शो!’

मेलबर्नची सुरुवात खराब झाली. मार्कस स्टॉईनिसला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर आणखी दोन विकेट्स झटपट गेल्यानं मेलबर्नची अवस्था 3 आऊट 34 अशी झाली होती. त्यानंतर मॅक्सवलेनं मॅचची सूत्रं हाती घेतली. मॅक्सवेलनं 26 बॉल्समध्ये 46 रन्स काढले. यामध्ये 3 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. हिल्टन कॅटराईटनंही नाबाद 46 रन्स काढत मेलबर्नच्या विजयी सलमीवर शिक्कामोर्तब केलं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: