फोटो – ट्विटर, ब्रिस्बेन हिट

राशिद खान (Rashid Khan) हे T20 क्रिकेटमध्ये सर्वात आघाडीचे नाव आहे. जगातील कोणतीही T20 लीग राशिदशिवाय पूर्ण होत नाही. तो त्या लीगमध्ये निवडला जाणरा पहिला विदेशी खेळाडू असतो. बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) राशिद अ‍ॅडलेड स्ट्राईकर्स (Adelaide Strikers) टीमकडून खेळतो. ब्रिस्बेन हिट विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये (Adelaide Strikers vs Brisbane Heat) मॅचमध्ये राशिदनं 4 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स (Rashid Khan 6 Wickets) घेतल्या. राशिद खानच्या या ‘करामती’ कामगिरीमुळे स्ट्राईकर्सनी ही मॅच 71 रनने जिंकली. पण, राशिदची एकाच मॅचमध्ये दोनदा एक महत्त्वाची संधी हुकली.

6 रनमध्ये 6 विकेट्स!

राशिदची या बिग बॅश सिझनमधील शेवटची मॅच होती. त्याने शेवटच्या मॅचमध्ये सर्वोत्तम खेळ केला. अर्थात त्याची सुरूवात खराब झाली होती. राशिदला पहिल्याच बॉलवर फोर लगावण्यात आला. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये एकही विकेट न घेता 11 रन दिले.

पहिली ओव्हर खराब गेल्यानंतर राशिदनं भन्नाट कमबॅक केले. त्याने पुढच्या 3 ओव्हर्समध्ये 6 रन देत 6 विकेट्स घेतल्या. राशिदने त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 रन देत 2, तिसऱ्या ओव्हरमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 रन देत 1 तर चौथ्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन देत 3 विकेट्स घेतल्या. राशिदच्या या जादूच्या प्रयोगाचे चटके ‘हिट’ टीमला (Rashid Khan 6 Wickets) बसले. त्यांची संपूर्ण टीम 15 ओव्हर्समध्ये 90 रनवर ऑल आऊट झाली.

6 विकेट्स घेतल्या पण….

राशिद खानने या मॅचमध्ये 6 विकेट्स घेतल्या पण, त्याला हॅट्ट्रिक घेता आली नाही. त्या हॅट्ट्रिक घेण्याची संधी दोन वेळा हुकली. राशिदला हिटच्या इनिंगमधील 9 व्या आणि 15 व्या ओव्हरमध्ये दोन हॅट्ट्रिकची संधी होती, पण त्याला हॅट्ट्रिक पूर्ण करता आली नाही.

राशिद खानची ही 300 वी T20 मॅच होती. त्या मॅचमध्ये त्याने 17 रन देत 6 विकेट्स घेतल्या. ही बिग बॅश लीग स्पर्धेच्या इतिहासात एखाद्या बॉलरची तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी आहे. लसिथ मलिंगा (7 रनमध्ये 6 विकेट्स) आणि इश सोधी (11 रन देत 6 विकेट्स) नंतरची ही सर्वोत्तम कामगिरी (Rashid Khan 6 Wickets) आहे.

ब्रिस्बेनमध्ये झालेल्या या मॅचमध्ये स्ट्राईकर्सने पहिल्यांदा बॅटींग करत 4 आऊट 161 रन केले होते. त्याला उत्तर देताना हिटचे फक्त 3 बॅटर दोन अंकी रन करू शकले.

सनरायझर्स हैदराबादाचा राशिदला रामराम, 11 ची सरासरी असणारा बॅटर रिटेन

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: