फोटो – ट्विटर, सिडनी थंडर

बिग बॅश लीग (Big Bash League 2021-22)  स्पर्धेत रविवारी झालेल्या मॅचमध्ये ‘सिडनी थंडर’नं (Sydney Thunder) ‘सुपर हॉट’ विजय मिळवला आहे. या मॅचमध्ये इंग्लंडचा फास्ट बॉलर साकिब महमूदनं थंडरकडून स्पर्धेत पदार्पण केले. या पदार्पणातच त्याने 4 विकेट्स (Saqib Mahmood 4 Wickets) घेतल्या. त्याच्या खेळामुळे थंडरनं ब्रिस्बेन हिटचा (Brisbane Heat) 53 रनने पराभव केला.

11 बॉलमध्ये 4 विकेट्स

सिडनीकडून पहिली ओव्हर्स टाकण्यासाठी आलेल्या साकीबनं सुरुवातच सनसनाटी केली. त्याने तिसऱ्याच बॉलवर कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) माजी ओपनर ख्रिस लीनला 4 रनवर आऊट केले. त्यानंतर 2 बॉलने त्याने बेन डकेतला 2 रनवर आऊट करत ब्रिस्बेनला दुसरा धक्का दिला.

साकिबचा झंझावात दुसऱ्या ओव्हरमध्येही सुरू होता. त्या ओव्हरमध्ये त्याने सॅम हिजलॅट, आणि जिमी पियर्सन यांना आऊट केले. साकीबच्या त्या ओव्हरमध्ये मॅक्स ब्रायंट देखील रन आऊट झाला. त्यामुळे तिसऱ्या ओव्हरनंतर ब्रिस्बेनच्या टीमची अवस्था 5 आऊट 28 अशी  होती. त्यामध्ये साकीबने 2 ओव्हर्समध्ये 9 रन देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. साकिबने बिग बॅश कारकिर्दीमधील पहिल्या 11 बॉलमध्येच 4 विकेट्स घेत स्पर्धेत स्वप्नवत पदार्पण केले.

पहिल्या 3 ओव्हरमध्ये मिळालेल्या धक्क्यातून ब्रिस्बेनची टीम काही सावरलीच नाही. त्यांची टीम 17.3  ओव्हर्समध्ये 143 रनवर ऑल आऊट झाली. साकीबनं संपूर्ण मॅचमध्ये 3 ओव्हर्समध्ये 22 रन देत 4 विकेट्स (Saqib Mahmood 4 Wickets) घेतल्या.

सॅम बिलिंग्जची हाफ सेंच्युरी

सिडनी थंडरच्या बॉलिंगचा साकिब महमूद हिरो ठरला. तर त्यांची बॅटींग इंग्लंडच्या सॅम बिलिंग्जने गाजवली. बिलिंग्जने फक्त 27 बॉलमध्ये 5 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने 64 रन काढले. मिडल ऑर्डरमधील विकेट किपर-बॅटर असलेला बिलिंग्ज सध्या फॉर्मात असून त्याच्या या फॉर्मचा आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction)  टीमना दखल घ्यावी लागेल.

बिलिंग्जच्या हाफ सेंच्युरीमुळे थंडरने पहिल्यांदा बॅटींग करताना 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 196 रन केले. थंडरचा आणखी एक इंग्लिश खेळाडू अ‍ॅलेक्स हेल्सनं (Alex Hales) 26 बॉलमध्ये 35 रन काढले. थंडरने शेवटच्या टप्प्यात विकेट्स गमावल्यानं त्यांना 200 रनचा टप्पा पार करता आला नाही, पण साकिबच्या बॉलिंगमुळे (Saqib Mahmood 4 Wickets) त्यांनी 197 रनच्या टार्गेटचं सहज संरक्षण केले.

103 वर 99 भारी! 2 RCB स्टार्सच्या लढतीत चॅम्पियन टीमची बाजी  

पाकिस्तानला दिला होता त्रास

पाकिस्तान क्रिकेट टीमनं (Pakistan Cricket Team) जून महिन्यात इंग्लंडचा दौरा केला होता. या सीरिजमधील पहिल्या वन-डे पूर्वी इंग्लंडच्या टीममध्ये कोरोना ब्लास्ट झाला. त्यामुळे त्यांना संपूर्ण टीम बदलावी लागली होती. संपूर्ण टीम क्वारंटाईन झाल्यानं बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) कॅप्टनसीमध्ये इंग्लंडची B टीम पाकिस्तान विरुद्ध वन-डे सीरिज खेळली.

साकिब महमूदनं त्या सीरिजमध्ये पाकिस्तानच्या बॅटर्सना रडवले होते. त्यानं पहिल्याच मॅचमध्ये बाबर आझमला (Babar Azam) शून्यावर आऊट करत याची सुरूवात केली. त्यानंतर त्यानं 3 वन-डेमध्ये 9 विकेट्स घेतल्या. महमूदच्या कामगिरीच्या जोरावर (Saqib Mahmood 4 Wickets)  इंग्लंडच्या B टीमनं पाकिस्तानच्या अव्वल टीमचा 3 वन-डे मॅचच्या सीरिजमध्ये 3-0 ने पराभव केला होता.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: