फोटो – ट्विटर

क्रिकेट मॅचमध्ये वैयक्तिक रेकॉर्ड होऊनही अनेकदा टीम पराभूत झाल्याचं सत्य खेळाडूंना पचवावे लागते. मेलबर्न स्टार्सचा (Melbourne Stars) कॅप्टन ग्लेन मॅक्सवेलनं बिग बॅश लीगमधील (Big Bash League) पहिली सेंच्युरी झळकावली. त्यानंतरही त्याची टीम पराभूत झाली. मॅक्सवेलला यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) रिटेन केले आहे. त्याच्या या सेंच्युरीवर आरसीबीच्या माजी खेळाडूनेच पाणी (Maxwell century in vain) ओतले. दोन आरसीबी स्टार्सच्या या लढतीत बिग बॅश चॅम्पियन सिडनी सिक्सर्सनं (Sydney Sixers) 2 बॉल आणि 7 विकेट्स राखून विजय मिळवला.

The Maxwell Show

पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या मेलबर्न स्टार्सची सुरूवात खराब झाली. मार्कस स्टॉईनिस आणि जो क्लार्क ही ओपनिंग जोडी आली आणि आऊट होऊन परतली. स्टार्सची अवस्था 2 आऊट 6 होती त्यावेळी मॅक्सवेलनं मैदानात पाऊल ठेवले. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) म्हणजेच घरच्या मैदानात टीमला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी मॅक्सवेलवर होती.

संथ सुरुवात केलेल्या मॅक्सवेलला 15 रनवर जीवदान मिळाले. त्याने तो आनंद बिग बॅश कारकिर्दीतील 100 वा सिक्स लगावत साजरा केला. स्टार्सची 12 व्या ओव्हरपर्यंत वाटचाल संथ होती. त्यानंतर घेतल्या पॉवर सर्जमध्ये (Power surge) परिस्थिती बदलली.

ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या पहिल्या ओव्हरमध्ये मॅक्सवेलला पूर्ण फायदा घेता आला नाही. पण पॉवर सर्जच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने 3 फोर आणि 1 सिक्ससह 20 रन काढले. 35 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी करणाऱ्या मॅक्सवेलने पुढील 50 रन फक्त 19 बॉलमध्ये पूर्ण केले. त्याने 12 फोर आणि 3 सिक्ससह सेंच्युरी झळकाली. तो 19 व्या ओव्हरमध्ये 103 रन काढून आऊट झाला. त्याच्या सेंच्युरीमुळे मेलबर्न स्टार्सनी सिडनी सिक्सर्सपुढे 178 रनचे टार्गेट दिले.

सिक्सर्सचा सफाईदार विजय

सिडनी सिक्सर्सनी बिग बॅशमधील बेस्ट टीम का आहोत हे 179 रनचा पाठलाग करताना (Maxwell century in vain)  दाखवलं. आरसीबीच्या मॅक्सवेलने सेंच्युरी लगावल्यानंतर त्याला आरसीबीचा माजी खेळाडू आणि सिक्सर्सचा विकेट किपर-बॅटर जोश फिलिपे (Josh Phillipe) याने उत्तर दिले. सिक्सर्सचं मुख्य हत्यार असलेल्या अ‍ॅडम झम्पाला (Adam Zampa) फिलिपेने नीट खेळून काढले. त्यानंतर सिक्सर्सच्या बॉलर्सना मॅचवर नियंत्रण मिळवता आले नाही.

ऑस्ट्रेलियन स्पिनरची जादू, कॅप्टनच्या मोठ्या चुकीनंतरही जिंकून दिली थरारक मॅच!

मॅक्सवेलनं बॉलिंगमध्ये सतत बदल करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचे हे बदल यशस्वी झाले नाहीत. जोश फिलिपेची सेंच्युरी फक्त 1 रनने हुकली. तो 99 रनवर नॉट आऊट राहिला. पण त्याने सिडनी सिक्सर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब (Maxwell century in vain) केले.

सिडनी सिक्सर्सचा हा 4 मॅचमधील तिसरा विजय असून स्पर्धेतील 13 व्या मॅचनंतर ही टीम 11 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर मेलबर्न स्टार्सची टीम 4 मॅचमध्ये 2 विजय आणि 2 पराभवानंतर 7 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: