फोटो – ट्विटर

फायनल मॅचमधील पहिल्या 6 ओव्हर्समध्येच 4 विकेट गेल्यानंतर कोणतीही टीम बॅक फुटवर जाऊ शकते. फायनलच्या प्रेशरमुळे ती टीम दबून जाण्याचा धोका जास्त असतो. पर्थ स्क्रॉचर्स विरूद्ध सिडनी सिक्सर्स (Perth Scorchers vs Sydney Sixers) या मॅचमध्ये पर्थची टीम अडचणीत सापडली होती. टॉपचे 4 बॅटर 6 ओव्हरमध्येच आऊट झाल्यानं ‘पर्थ’चा ‘अनर्थ’ होणार असे वाटत होते. पण त्यांनी जिगरबाज खेळ करत बाजी पलटवली. सिक्सर्सचा 79 रननं पराभव करत बिग बॅश लीगचे (Big Bash League 2021-22) चौथ्यांदा विजेतेपद (Perth Scorchers Champion) पटकावले.

कसा टळला अनर्थ

पहिल्यांदा बॅटींगसाठी आलेल्या पर्थची सुरूवात खराब झाली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये कुर्टीस पॅटरसन आऊट झाला. त्यानंतर पाचव्या ओव्हरमध्ये जोश इंग्लिसही परतला. पर्थचा सर्वात मोठा मॅच विनर मिचेल मार्श (Mitchell Marsh) आणि कॉलीन मुन्रो या दोघांनाही सहाव्या ओव्हरमध्ये नॅथन लायननं (Nathan Lyon) आऊट केलं. त्यावेळी पर्थचा स्कोअर 4 आऊट 25 झाला होता.

सिक्सर्स विजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याची शक्यता वाढली होती. पण कॅप्टन अ‍ॅस्टन टर्नरनं हार मानली नव्हती. त्याने लॉरी इव्हान्सच्या मदतीनं सिक्सर्सवर प्रतिहल्ला केला. टर्नर इव्हान्स जोडीनं पाचव्या विकेटसाठी 51 बॉलमध्ये 104 रनची पार्टनरशिप केली. इव्हान्सनं 25 तर टर्नरनं 32 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी पूर्ण केली.

29 फोर, 11 सिक्ससह 20 ओव्हर्समध्ये काढले 273 रन, थोडक्यात वाचला वर्ल्ड रेकॉर्ड

टर्नर 54 रन काढून आऊट झाला. पण इव्हान्सनं 41 बॉलमध्ये 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं नाबाद 76 रन काढाले. या दोघांच्या प्रयत्नामुळेच पर्थनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 171 असा आव्हानात्मक स्कोअर केला.

सिक्सर्सची निराशा

सिडनी सिक्सर्सला नॉक आऊटमध्ये कोरोनाचा फटका बसला.तरीही ही टीम बिग बॅश लीगमधील सर्वाधिक व्यावसायिक आणि चिवट टीम म्हणून ओळखली जाते. त्यामुळे त्यांच्याकडून सर्वांना मोठी अपेक्षा होती. प्रत्यक्षात 172 रनचा पाठलाग सिक्सर्सनी साफ निराशा केली. डॅनियल ह्यूजेसनं 42 रनची खेळी करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याला कुणाचीही साथ मिळाली नाही.

सिक्सर्सची टीम अवघ्या 16.2 ओव्हर्समध्ये फक्त 92 रनवरच ऑल आऊट झाली. पर्थ स्क्रॉचर्सनं ही फायनल 79 रनच्या मोठ्या फरकानं जिंकत विजेतेपद (Perth Scorchers Champion) पटकावले. पर्थकडून अनुभवी अ‍ॅण्ड्रयू टाय सर्वात यशस्वी बॉलर ठरला त्याने 15 रन देत 3 विकेट्स घेतल्या.

चौथे विजतेपद

पर्थ स्क्रॉचर्सचं बिग बॅश लीग स्पर्धेतील हे चौथे विजेतेपद आहे. पर्थनं यापूर्वी 2013-14, 2014-15 आणि 2016-17 साली विजेतेपद पटकावले आहे. मागील दोन सिझन त्यांच्यासाठी खराब गेले होते. पर्थची टीम मागच्या सिझनमध्ये सहाव्या तर त्यापूर्वीच्या सिझनमघ्ये आठव्या क्रमांकावर होती. यंदा त्यांनी फक्त 3 मॅच गमावत विजेतेपद (Perth Scorchers Champion) पटकावले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: