फोटो – ट्विटर

त्याच्या गुणवत्तेला गेल्या 10 वर्षांपासून खराब फिटनेसचा शाप छळतोय. त्यामुळे तो एकेकाळी देशातील सर्वात तिरस्करणीय क्रिकेटपटू होता. पण, या वर्षात सर्व परिस्थिती बदलली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाला गेल्या 14 वर्षांपासून हुलकावणी देणारं T20 वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून दिले. T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावणाऱ्या मिचेल मार्शचा (Mitchell Marsh) फॉर्म बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League 2021-22) देखील कायम आहे. मार्शने झळकावलेल्या सेंच्युरीमुळे (Mitchell Marsh 100) पर्थ स्कॉचर्सनं होबार्ट हुरिकेन्सचा (Perth Scorchers vs Hobart Hurricanes)  53 रनने पराभव केला आहे.

खराब सुरूवात, मार्श दमदार!

पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या पर्थची सुरूवात खराब झाली. मागच्या मॅचमध्ये सेंच्युरी करणारा कॉलिन मुन्रो शून्यावर आऊट झाला. मुन्रो फक्त 2 बॉलच मैदानात टिकाला. त्यामुळे मार्शला पहिल्याच ओव्हरमध्ये मैदानात उतरावे लागले. या मोठ्या धक्क्याचा मार्शवर परिणाम झाला नाही. त्याने T20 वर्ल्ड कपमधील थाटात पहिल्या बॉलवर फोर लगावत इनिंगची सुरूवात केली.

मिचेल मार्श आत्मविश्वासानं खेळत होता. त्याचवेळी पर्थच्या टॉप ऑर्डरने निराशा केली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटचं भवितव्य समजला जाणारा जोश इंग्लिस 2 रन काढून आऊट झाला. कॅप्टन एश्टन टर्नरही 17 रनवर परतला. पर्थची 10 व्या ओव्हरमध्ये 4 आऊट 74 अशी अवस्था झाली होती.

ऑस्ट्रेलियन स्पिनरची जादू, कॅप्टनच्या मोठ्या चुकीनंतरही जिंकून दिली थरारक मॅच!

शेवटच्या ओव्हर्समध्ये धडका

मिचेल मार्श एका बाजूने खेळत असल्यानं त्याला साथ देण्याची गरज होती. लॉरी इव्हान या इंग्लिश खेळाडूनं ते काम केले. या सिझनमध्ये तो पहिल्यांदाच पर्थकडून खेळतोय. यापूर्वीच्या मॅचमध्ये भरीव कामगिरी न करणाऱ्या इव्हान्सने होबार्ट विरुद्ध 24 बॉलमध्येच 40 रन काढले.

इव्हान्सने साथ दिल्यानं मार्शनेही शेवटच्या टप्प्यात मुक्त फटकेबाजी केली. हाफ सेंच्युरीसाठी 37 बॉल घेणाऱ्या मार्शने पुढचे 50 रन 23 बॉलमध्येच पूर्ण केले. त्यातही शेवटच्या 9 बॉलमध्ये त्याने 32 रन काढले. मार्शने 60 बॉलमध्ये 6 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने नाबाद 100 रन केले. पर्थकडून सेंच्युरी झळकावणाऱा (Mitchell Marsh 100) तो या सिझनधील दुसरा तर एकूण पाचवा क्रिकेटपटू ठरला आहे.

IPL मध्ये मिळणार किंमत

मिचेल मार्शच्या सेंच्युरीमुळे पर्थने होबार्ट समोर मॅच जिंकण्यासाठी 183 रनचे टार्गेट ठेवले. यापूर्वीच्या मॅचमध्ये 93 रन काढणारा वर्ल्ड कप स्टार मॅथ्यू वेड (Matthew Wade) पहिल्याच ओव्हरमध्ये 4 रन काढून आऊट झाला. त्यानंतर होबार्ट्सच्या विकेट्स ठराविक अंतराने पडल्या. त्यांची संपूर्ण टीम 19 ओव्हर्समध्ये 129 रनवर ऑल आऊट झाली. त्यामुळे पर्थला 53 रनने मोठा विजय मिळवला.

कॅन्सरला हरवलं, जगण्यासाठी सुतारकाम केलं आणि संधी मिळताच बनला ऐतिहासिक विजयाचा हिरो!

वेस्ट इंडिज दौरा, T20 वर्ल्ड कप आणि आता बिग बॅश या वर्षात मिचेल मार्श सातत्याने रन करतोय. त्याने फिटनेसवरही बरंच काम केलेलं आहे. त्यामुळे फॉर्मातील मार्शला (Mitchell Marsh 100)  करारबद्ध करण्यासाठी आगामी आयपीएल ऑक्शनमध्ये (IPL 2022 Auction) टीमना तिजोरी रिकामी करावी लागणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: