फोटो – ट्विटर

खेळातील कोणत्याही मैदानात यश मिळाल्यानंतर खेळाडू त्याचे लगेच सेलिब्रेशन करतात.  क्रिकेट खेळताना सेंच्युरी झाल्यानंतर किंवा विकेट घेतल्यानंतर खेळाडू आनंद व्यक्त करतात. हे सेलिब्रेशन जितकं हटकं असेल तितकं ते लवकर व्हायरल (Viral) होते, असा आजवरचा अनुभव आहे. हटके सेलिब्रेशनमुळे व्हायरल झाल्यानंतर तो खेळाडू फॅन्सच्या लक्षात राहण्यातही मदत होते. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) पाकिस्तानच्या बॉलरने मैदानात चक्क कोरोना सेफ सेलिब्रेशन (Corona Safe Celebration) केले.

नेमके काय घडले?

मेलबर्न स्टार्स विरुद्ध पर्थ स्क्रॉचर्स (Melbourne Stars vs Perth Scorchers) यांच्यातील मॅचमध्ये हा प्रकार घडला. या मॅचमध्ये पर्थची टीम पहिल्यांदा बॅटींग करत होती. त्यावेळी स्टार्सकडून खेळणारा पाकिस्तानचा फास्ट बॉलर हॅरीस राऊफ (Haris Rauf) याने पर्थचा ओपनर कुर्टीस पॅटरसनला आऊट केल्यानंतर हे सेलिब्रेशन केले.

हॅरीसने ही विकेट घेताच सर्वांनी कोरोनापासून वाचण्यासाठी हात नियमित धुतले पाहिजेत असा अभिनयातून संदेश दिला. त्याचबरोबर खिशातील मास्क काढून चेहऱ्याला लावला. हॅरीसचे हटके सेलिब्रेशन (Corona Safe Celebration) सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

स्टार्सला कोरोनाचा फटका

बिग बॅश लीगमध्ये ग्लेन मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या मेलबर्न स्टार्सला कोरनाचा मोठा फटका बसला. या टीमचे खेळाडू आणि स्टाफमधील एक डझनहून अधिक जणांना कोरोनामुळे बाहेर बसावं लागलं. त्याचा फटका त्यांच्या स्पर्धेतील वाटचालीवरही झाला आहे. स्टार्सची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

RCB च्या ऑल राऊंडरची कमाल, 15 बॉलमध्ये काढले 76 रन!

पर्थचा दमदार विजय

हॅरीसच्या सेलिब्रेशनमुळे लक्षवेधी ठरलेली ही मॅच पर्थने 47 रनच्या फरकाने जिंकली. पर्थने पहिल्यांदा बॅटींग करत 3 आऊट 196 रन केले. पर्थने पहिल्यांदा बॅटींग करत 3 आऊट 196 रन केले. पर्थकडून विकेट किपर लॉरी इव्हान्सने सर्वाधिक 69 रन केले. त्याने 46 बॉलमध्ये 2 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने ही खेळी केली.

निक हॉब्सन (46) आणि कॅप्टन अ‍ॅश्टन टर्नरने (47) पर्थच्या इनिंगमध्ये उपयुक्त योगदान दिले. स्टार्सकडून हॅरीस सर्वात यशस्वी बॉलर (Corona Safe Celebration) ठरला त्याने 4 ओव्हर्समध्ये 38 रन देत 2 विकेट्स घेतल्या.

स्टार्सना 197 रनचे आव्हान पेलवले नाही. त्यांची टीम 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 149 रन करू शकली. स्टार्सकडून वेबस्टर्सनं सर्वात जास्त 63 रन केले. कोरोनानंतर टीममध्ये परतलेला कॅप्टन मॅक्सवेल अपयशी ठरला. त्याने फक्त 5 रन केले.

2 इनिंग 250 रन 5 योगायोग, लॅथमने केली कॅप्टनची बरोबरी, तुम्ही म्हणाल क्या बात है!

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: