फोटो – सोशल मीडिया

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) स्पिरिट ऑफ क्रिकेट (Spirit of Cricket) जपण्यासाठी निवृत्तीनंतर कायम आग्रही असतो. त्यामुळेच त्याने दिल्ली कॅपिटल्स टीममध्ये आल्यानंतर आर. अश्विनला (R. Ashwin) बॅटरनं बॉल टाकण्यापूर्वी क्रिझ सोडलं तरी रन आऊट न करण्याची सूचना दिली आहे. पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियात मात्र स्पिरिट ऑफ क्रिकेटच्या पुन्हा एकदा चिंधड्या उडाल्या आहेत, सिडनी सिक्सर्स विरूद्ध अ‍ॅडलेड स्ट्राईकर्स (Sydney Sixers vs Adelaide Strikers) या नॉक आऊट मॅचमध्ये हा प्रकार घडला.ही मॅच जिंकणाऱ्या सिडनी सिक्सर्सवर रडीचा डाव (Sydney Sixers Cheat) खेळल्याचा आरोप होत आहे.   

नेमके काय घडले?

बिग बॅशमधील फायलपूर्वी नॉक आऊट मॅचमध्ये स्ट्राईकर्सनं पहिल्यांदा बॅटींग करताना 20 ओव्हरमध्ये 167 रन केले. सिक्सर्सनी 168 रनचे टार्गेट शेवटच्या बॉलवर पूर्ण केले. सिक्सर्सनी मॅचमध्ये चांगला खेळ केला. पण, शेवटच्या बॉलवर जिंकण्यासाठी 2 रन बाकी होते त्यावेळी त्यांनी घेतलेल्या एका निर्णयावर सध्या वाद सुरू झाला आहे.

सिक्सर्सनं शेवटच्या बॉलपूर्वी त्यांचा बॅटर जॉर्डन सिल्क (Jorden Silk) याला रिटायर हर्ट केले. सिक्सर्सचा हा निर्णय ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’च्या विरूद्ध असल्याचे मानले जात आहे. जॉर्डन सिल्कचे स्नायू फिल्डिंग करताना दुखावले होते. त्यामुळे तो आठव्या क्रमांकावर बॅटींगला आला.

सिल्क शेवटच्या ओव्हरमध्ये 4 बॉल बाकी असताना बॅटींगलाठी उतरला. तो मैदानात आला तेव्हा दुसऱ्या बाजूने हेडन कीर कमालीची बॅटींग करत होता. सिक्सर्सला शेवटच्या बॉलवर जिंकण्यासाठी 2 रन हवे होते. तेव्हा सिक्सर्सच्या मॅनेजमेंटनं सिल्कला रिटायर हर्ट घोषित केले आणि जे लँटनला मैदानात पाठवले. शेवटच्या बॉलवर हेडनला खराब फिल्डिंगमुळे चार रन मिळाले. पण, ऑस्ट्रेलियातील दिग्गज क्रिकेटपटूंनीच सिक्सर्सच्या या निर्णयावर (Sydney Sixers Cheat) नाराजी व्यक्त केली आहे.

Spirit of Cricket ला कमिन्सचा ठेंगा, इंग्लिश बॉलरची रोखली hat-trick

सिक्सर्सवर ऑस्ट्रेलियातूनच टीका

ऑस्ट्रेलियाचा माजी ओपनर मार्क वॉ (Mark Waugh) स्ट्राईकर्सच्या या निर्णयावर नाराज झाला आहे. ‘ही कृती नियमामध्ये आहे, पण स्पिरिट ऑफ क्रिकेटमध्ये बसत नाही,’ असे मत त्याने व्यक्त केलं आहे. अ‍ॅडम गिसख्रिस्टची (Adam Gilchrist) देखील अशीच प्रतिक्रिया आहे. मला हे आवडलं नाही, असं गिलख्रिस्टने (Sydney Sixers Cheat) सांगितले.

सिक्सर्सचे स्पष्टीकरण काय?

सिडनी सिक्सर्सचा कॅप्टन मोईसेस हेन्रिक्स याने टीमच्या निर्णयाचा जोरदार बचाव केला आहे. ‘ही अगदी नियमातील गोष्ट आहे. दुर्दैवाने जॉर्डन सिल्कचे स्नायू दुखावले होते. सिल्क या लीगमधील सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे. पण, आम्ही गेल्या 8 दिवसात 5 वेळा विमान प्रवास केला आहे. त्यामुळे खेळाडूंना थकवा जाणवत आहे.’ असे सिक्सर्सच्या कॅप्टनने सांगितले.

आयपीएल स्पर्धेत आर. अश्विनला स्पिरिट ऑफ गेम शिकवणाऱ्या रिकी पॉन्टिंगची त्यांच्याच देशात घडलेल्या या प्रकारावरील प्रतिक्रिया (Sydney Sixers Cheat) अजून समजलेली नाही.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

 

error: