फोटो – ट्विटर, मिरर स्पोर्ट्स

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेला (Big Bash League 2021-22) कोरनाचा विळखा पडला आहे. या स्पर्धेतील अनेक टीमना कोरोनाचा फटका बसला आहे. बिग बॅश लीगच्या या सिझनची फायनल शुक्रवारी (28 जानेवारी 2022) होत आहे. यंदाच्या फायनलमधील टीम सिडनी सिक्सर्सला (Sydney Sixers) कोरोनामुळे Playing 11  तयार करणे अवघड जात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर डॅन ख्रिस्टीन (Dan Christian)  याने ट्विट करत 11 फिट आणि कोव्हिड फ्री (11 Covid free players) हवे आहेत अशी जाहिरात दिली आहे.

मॅच जिंकण्यासाठी शेवटच्या बॉलवर रडीचा डाव, ऑस्ट्रेलियात Spirit of Cricket च्या पुन्हा चिंधड्या

सिडनीसमोर अनेक अडचणी

सिडनी सिक्सर्स तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या निर्धारानं फायनलमध्ये उतरणार आहे. पर्थ स्क्रॉचर्स विरूद्ध या फायनलपूर्वी (Sydney Sixers vs Perth Scorchers) टीमसमोर अनेक अडचणी आहेत. अ‍ॅडलेड स्ट्राईकर्स विरूद्धच्या मॅचमध्ये सिक्सर्सना शेवटच्या क्षणी असिस्टंट कोच जे लँटनला विकेट किपर म्हणून खेळवावं लागलं. सिक्सर्सनी ती मॅच अगदी शेवटच्या बॉलवर जिंकली.

आता पर्थ विरूद्धच्या फायनलपूर्वी टीममधील अनफिट खेळाडूंची संख्या आणखी वाढली आहे. टीमचे कॅप्टन मोईसेस हेन्रिक्स, स्टीव्ह को किफ आणि जॉर्डन सिल्क हे दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे टीमला प्लेईंग 11 तयार करणे (11 Covid free players)  अवघड आहे.

जाहिरातीमधून बोर्डाला टोला

सिडनी सिक्सर्सचा ऑल राऊंडर डॅन ख्रिस्टीननं फायनलपूर्वी फिट आणि कोव्हिड फ्री खेळाडूंसाठी थेट ट्विटरवरून जाहिरात दिली आहे.

‘मेलबर्नमध्ये कुणी असेल तर सांगा. उद्या रात्री क्रिकेटची मॅच खेळायची आहे. माझी टीमसमोर 11 फिट आणि कोव्हिड फ्री खेळाडू मैदानात उतरवण्याचा प्रश्न (11 Covid free players) आहे. मार्वेल स्टेडियमवर संध्याकाळी 6.30 वाजता वॉर्म अप सुरू होईल. यानंतर एक मोफत बिअर बहुधा मोठ्या कपात देण्यात येईल. तुम्ही उत्सुक असाल तर मला थेट मेसेज करा. कृपया नोंद घ्या, टेस्ट क्रिकेटर नको आहेत.’ असे ट्विट ख्रिस्टीननं फायनलच्या आदल्या दिवशी केले आहे.

ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) सिडनी सिक्सर्सकडून खेळण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (Cricket Australia) परवानगी नाकारली आहे, त्यामुळे ख्रिस्टीननं त्याच्या ट्विटमध्ये टेस्ट क्रिकेटर नको असा टोला लगावला आहे.

डीव्हिलियर्स, आर्चरकडून उत्तर

डॅन ख्रिस्टीनच्या या उपहासात्मक ट्विटला दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन एबी डीव्हलियर्स (AB de Villiers) आणि इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) यांनी मजेदार उत्तर दिलं आहे. ‘मला 4 ओव्हर्स बॉलिंग मिळेल अशी खात्री देत असशील तर मी तयार आहे,’ असे डीव्हिलियर्सनं म्हंटले आहे. तर मला यासाठी पैसे द्यावे लागतील का? असा प्रश्न आर्चरनं विचारला आहे.

सिडनी सिक्सर्स आणि पर्थ स्क्रॉचर्स या बिग बॅश लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहेत. सिक्सर्सनी आजवर 4 वेळा तर स्क्रॉचर्सनी 3 वेळा ही स्पर्धा (11 Covid free players) जिंकली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: