फोटो – ट्विटर, सिडनी सिक्सर्स

बिग बॅश लीगमधील (Big Bash League 2021-22) दुसरी नॉक आऊट मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार झाली. सिडनी सिक्सर्स विरूद्ध अ‍ॅडलेड स्ट्राईकर्स (Sydney Sixers vs Adelaide Strikers) या नॉक आऊट मॅचमध्ये सिक्सर्सनी अगदी शेवटच्या बॉलवर विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. दोन्ही टीमनं या मॅचमध्ये विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यामुळे अगदी शेवटच्या बॉलवरही मॅचचे तिन्ही निकाल शक्य होते. पण या सर्वापेक्षा सिडनी सिक्सर्सचा असिस्टंट कोच जे लँटन (Jay Lenton) या मॅचमध्ये खेळाडू म्हणून मैदानात उतरला. संपूर्ण स्पर्धेत आणि अगदी 24 तासांपूर्वी टीमचा कोच असलेला व्यक्ती खेळाडू म्हणून खेळण्याची एखाद्या मोठ्या स्पर्धेत ही पहिलीच घटना असावी.

काय घडले कारण?

सिडनी सिक्सर्सला हा निर्णय अगदी शेवटच्या क्षणी आणि नाईलाजाने घ्यावा लागला. सिडनी सिक्सर्सचा ओपनर आणि विकेट किपर जोश फिलिपे (Josh Philippe) याला कोरोनाची लागण झाल्याचं मॅचपूर्वी स्पष्ट झालं. त्याला बदली खेळाडू म्हणून कुणीही सिक्सर्सकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे लँटनला हँडग्लोज घालून मैदानात उतरावे लागले.

फायनलपूर्वीच्या नॉक आऊट मॅचममध्ये जोश फिलिपेला कोरोना होणे हा सिक्सर्ससाठी मोठा धक्का होता. फिलिपे या स्पर्धेत चांगल्याच फॉर्मात होता. त्याने 15 मॅचमध्ये 143.47 च्या स्ट्राईक रेटनं 429 रन केले होते. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश होता.

103 वर 99 भारी! 2 RCB स्टार्सच्या लढतीत चॅम्पियन टीमची बाजी

कोण आहे लँटन?

जे लँटन (Jay Lenton) या सिझनमध्ये सिडनी सिक्सर्सचा असिस्टंट कोच असला तरी त्याचे वय फक्त 31 आहे. न्यू साऊथ वेल्सकडून खेळणाऱ्या या विकेटकिपरनं 20 T20 मॅचमध्ये 136.45 च्या स्ट्राईक रेटनं 131 रन केले आहेत. तो मागच्या सिझनमध्ये सिडनी थंडर्सकडून 5 मॅच खेळला होता. पण खराब कामगिरीमुळे त्याला टीमनं रिटेन केले नाही आणि तो सिडनी सिक्सर्सचा असिस्टंट कोच बनला.

सिक्सर्सनं वास्तविक ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) खेळवण्याची परवानगी मागितली होती. पण स्मिथ यंदा बिग बॅश पूलमधील खेळाडू नव्हता. त्यामुळे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’नं ती परवानगी नाकारली.

सिक्सर्सचा थरराक विजय

सिक्सर्सचा ऑल राऊंडर हेडन कीर (Hayden Kerr) याने जोश फिलिपेची अनुपस्थिती टीमला जाणवू दिली नाही. या डावखुऱ्या फास्ट बॉलरनं या सिझनमध्ये सिक्सर्सकडून सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत. नॉक आऊट मॅचमध्ये त्याला फिलिपेच्या जागी ओपनिंगला पाठवण्याचा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला.

स्ट्राईकर्सनं दिलेल्या 168 रनचा पाठलाग करताना सिक्सर्सच्या विकेट ठराविक अंतरानं पडत असताना हेडन एका बाजूनं खंबरीपणे खेळत होता. त्याला 16 रनवर जीवदान मिळाले. त्याचा फायदा घेत त्याने 58 बॉलमध्ये 10 फोर आणि 2 सिक्ससह नाबाद 98 रन केले. शेवटच्या बॉलवर सिक्सर्सला विजयासाठी 2 रन हवे होते. त्यावेळी मिस फिल्डमुळे त्यांना 4 रन मिळाले आणि त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला. त्यावेळी असिस्टंट कोच जे लँटन (Jay Lenton) दुसऱ्या बाजूने खेळत होता. सिडनी सिक्सर्सनं मागील दोन्ही बिग बॅश सिझनमध्ये विजेतेपद पटकावले आहे. आता त्यांना हॅट्ट्रिकची संधी आहे. फायनलमध्ये त्यांची लढत पर्थ स्क्रॉचर्सशी होईल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: