फोटो – सोशल मीडिया

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धा (Big Bash League 2021-22) आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. या संपूर्ण स्पर्धेत काही अविस्मरणीय कॅच पाहयला मिळाले. सिडनी थंडर्स विरुद्ध अ‍ॅडलेड स्ट्राईकर्स (Sydney Thunder vs Adelaide Strikers) यांच्यातील नॉक आऊट मॅचमध्ये थंडर्सकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडरनं (Daniel Sams Stunning Catch) एक अफलातून कॅच घेतला आहे.

कसा घेतला कॅच…

मेलबर्नमध्ये झालेल्या या मॅचमध्ये स्ट्राईकर्सची पहिल्यांदा बॅटींग होती. स्ट्राईकर्सनं त्यांच्या इनिंगची सुरूवात जोरदार केली. विशेषत: ऑस्ट्रेलियन विकेट किपर आणि स्ट्राईकर्सचा ओपनर अ‍ॅलेक्स कॅरी (Alex Carey) जास्तच आक्रमक होता. कॅरीच्या आक्रमक खेळामुळे पहिल्या 4 ओव्हर्सच्या पॉवर प्लेमध्ये स्ट्राईकर्सनं बिनबाद 40 अशी भक्कम सुरूवात केली होती.

स्ट्राईकर्सच्या इनिंगमधील पाचव्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. तनवीर संघाच्या बॉलवर कॅरीनं स्वीप शॉट लगावला. त्यावेळी बॉल मिडविकेट ते स्केवयर लेगच्या दिशेन जात होता. बॉलचा वेग पाहता कॅरीला फोर किंवा सिक्स सहज मिळेल असा अंदाज होता. पण, तसं झालं नाही.

मिडविकेटच्या भागात उभ्या असलेल्या डॅनियल सॅम्सनं 7-8 पाऊल मागे जात आणि नंतर डाईव्ह लगावत एक अविश्वसनीय असा कॅच घेतला. सॅम्सनं घेतलेला तो कॅच पाहून तनवीर संघाला क्षणभर विश्वास बसला नाही. डॅनियल सॅम्सनं याच मॅचमध्ये सुरूवातीला एक सोपा कॅच सोडला होता. त्यानंतर हा अत्यंत अवघड असा कॅच घेत (Daniel Sams Stunning Catch)  त्याची त्यानं भरपाई केली.  

भन्नाट कॅचची स्पर्धा

बिग बॅश लीगमध्ये भन्नाट कॅचची स्पर्धा पाहयला मिळाली आहे. या स्पर्धेत काही अत्यंत अवघड कॅच घेतले गेले आहेत. मेलबर्न स्टार्स विरूद्ध ब्रिस्बेन हिट या  मॅचमध्ये (Melbourne Stars vs Brisbane Heat) स्टार्सचा कॅप्टन ग्लेन मॅक्सवेलनं देखील एक भन्नाट कॅच पकडला होता.  नॅथन कुल्टर नाईलच्या ओव्हरमध्ये सॅम हिजलवेटचा मॅक्सवेलनं घेतलेला कॅच हा या स्पर्धेतील एक सर्वोत्तम कॅच मानला जातो.  

Big Bash League: ग्लेन मॅक्सवेलनं घेतला डोळ्यावर विश्वास न बसणारा कॅच, पाहा VIDEO

स्ट्राईकर्सचा निसटता विजय

अ‍ॅडलेड स्ट्राईकर्सनं या मॅचमध्ये सिडनी थंडर्सचा 6 रननं पराभव केला आहे. स्ट्राईकर्सनं पहिल्यांदा बॅटींग करत 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 184 रन केले. सिडनीनं 185 रनच्या टार्गेटचा पाठलाग करण्याचा जोरदार प्रयत्न (Daniel Sams Stunning Catch)  केला. पण, त्यांचे प्रयत्न 6 रननं कमी पडले. स्ट्राईकर्सकडून 38 बॉलमध्ये 65 रनची खेळी करणारा इयान कॉकबेन ‘प्लेयर ऑफ द मॅच’ चा मानकरी ठरला.

या पराभवानंतर सिडनी थंडर्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर अ‍ॅडलेड स्ट्राईकर्सची 26 जानेवारी रोजी दुसऱ्या चॅलेंजर्समध्ये सिडनी सिक्सर्सशी लढत होणार आहे. यामधील विजेती टीम फायनलमध्ये पर्थ स्क्रॉचर्स विरुद्ध खेळेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: