
ऑस्ट्रेलियात सध्या बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत कोरोनाग्रस्त सदस्यांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. त्यामुळे काही मॅच स्थगित झाल्या, पण आयपीएल (IPL) किंवा पीएसएल (PSL) प्रमाणे स्पर्धा स्थगित झाली नाही, हे विशेष. मैदानाच्या बाहेर ही स्पर्धा अडचणीत आलीय. पण, त्याचवेळी मैदानात मात्र चांगलाच ड्रामा झाला. यंदा खेळाडूंचे वर्तन नाही तर अंपायरची चूक (Umpire Mistake in BBL) ही ड्रामाचा केंद्रबिंदू होती.
काय घडला प्रकार?
मेलबर्न स्टार्स विरुद्ध पर्थ स्कॉर्चर्स (Melbourne Stars vs Perth Scorchers) या मॅचमध्ये हा प्रकार घडला. या मॅचमध्ये पर्थच्या बॅटींग दरम्यान कॅप्टन एश्टन टर्नर खेळत होता. त्यावेळी स्टार्सच्या जेवर क्रोननं त्याला एक बाऊन्सर टाकला. त्या बाऊन्सरवर टर्नरनं खेळण्याचा प्रयत्न केला, पण बॉल त्याच्या हेल्मेटला लागून स्टंपच्या मागे गेला. या सर्व प्रयत्नात बॅट ही बॉलच्या अगदी जवळ होती आणि आवाजही आला. त्यामुळे फिल्डर्सनी आऊट असल्याचे अपिल केले.
अंपायर ब्रूस ओक्सनफर्डनं त्यांचा निर्णय घेतला होता. त्यांनी आऊट नसल्याचे बॅटरला सांगितले. पण, गडबडीमध्ये बोट वर करत तो आऊट असल्याची खूण केली. त्यामुळे थोडा वेळ सर्व जण गोंधळले. पण, अंपायरना त्यांची चूक लक्षात आली (Umpire Mistake in BBL) आणि त्यांनी निर्णय मागे घेत बॅटर नाबाद असल्याचे जाहीर केले.
स्टार्सचे 10 खेळाडू बाहेर
मेलबर्न स्टार्सचे 10 प्रमुख खेळाडू हे कोरोनाच्या कारणामुळे (पॉझिटिव्ह किंवा पॉझिटव्ह व्यक्तीच्या संपर्कात) टीमच्या बाहेर आहेत. त्यामुळे त्यांनी 4 बाहेर खेळाडूंना बोलावून प्लेईंग 11 पूर्ण केली आणि ही टीम पर्थ विरुद्ध मैदानात उतरली.
प्रमुख खेळाडूंशिवाय खेळणाऱ्या स्टार्सचा बलाढ्य पर्थ स्कॉर्चर्सनं 50 रननी पराभव केला. पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या पर्थच्या टीमनं 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 180 रन केले. पर्थकडून ओपनर पॅटरसननं 54 तर अनुभवी कॉलिन मुन्रोनं 40 रनचे योगदान दिले.
Big Bash League: OMG! ‘हा’ बॅटर आऊट होता?’ पाहा VIDEO
52 रनमध्ये गमावल्या 10 विकेट्स
181 रनचा पाठलाग करताना स्टार्सनी सुरूवात भक्कम केली. जो क्लार्क आणि बिग बॅशमध्ये पदार्पण करणाऱ्या टॉम रॉजर्सनं पहिल्या विकेटसाठी 8 ओव्हर्समध्ये 78 रनची पार्टनरशिप केली. ही जोडी फुटल्यानंतर स्टार्सची घसरगुंडी (Umpire Mistake in BBL) उडाली.
स्टार्सची संपूर्ण टीम 18.5 ओव्हर्समध्ये 130 रनवर आऊट झाली. याचाच अर्थ त्यांनी 52 रनमध्ये 10 विकेट्स गमावल्या. या विजयानंतर पर्थ स्कॉर्चसची टीम पॉईंट टेबलमध्ये पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आली आहे. पर्थचे 8 मॅचनंतर 25 पॉईंट्स आहेत. तर स्टार्सचे 7 मॅचनंतर 10 पॉईंट्स असून ही टीम सहाव्या क्रमांकावर आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.