फोटो – ट्विटर/@ThunderBBL

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) सलग दुसऱ्या दिवशी सेंच्युरी पाहयला मिळाली. दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) वगळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी (21 जानेवारी 2021) अ‍ॅलेक्स कॅरीनं (Alex Carey) 62 बॉलमध्ये 101 रनची खेळी केली होती. त्यानंतर लगेच शुक्रवारी (22 जानेवारी 2021) इंग्लंडच्या अ‍ॅलेक्स हेल्सनं (Alex Hales) कॅरीपेक्षा आक्रमक म्हणजे फक्त 51 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकली.

भारत दौऱ्यासाठी झालं होतं दुर्लक्ष

कॅरीच्या सेंच्युरीप्रमाणे हेल्सच्या सेंच्युरीलाही एक समान किनार आहे. आदल्याच दिवशी भारत दौऱ्यासाठी इंग्लंड टीमची (IND vs ENG) घोषणा झाली होती. या टीममध्ये हेल्सकडं निवड समितीनं दुर्लक्ष केलं होतं. सिडनी थंडरकडून (Sydney Thunder) खेळणाऱ्या हेल्सनं तो राग सिडनी सिक्सर्सच्या (Sydney Sixers) बॉलर्सवर काढला.

या मॅचमध्ये सिक्सर्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली होती. थंडर्सची सुरुवात खराब झाली. त्यांचा अनुभवी बॅट्समन उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) फक्त 6 रन काढून आऊट झाला. ख्वाजा आऊट झाल्यानंतर हेल्स आणि कॅप्टन कॅलम फर्ग्युसन (Callum Ferguson) यांची जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेट्ससाठी 69 रन्सची पार्टनरशिप केली. फर्ग्युसननं 42 रन काढले.

( वाचा : Big Bash League – ख्वाजा आऊट होता, अंपायरला नाही वाटला! DRS नसल्यानं क्रिकेटची थट्टा )

हेल्सचा झंझावात

फर्ग्युसन आऊट झाल्यानंतर हेल्सनं मॅचची सूत्रं हाती घेतली. त्यानं सुरुवातीला 26 बॉलमध्ये चार सिक्स आणि पाच फोरच्या मदतीनं हाफ सेंच्युरी झळकावली. त्यानंतर पुढे 51 बॉलमध्येच सेंच्युरी ठोकली. हेल्सनं फक्त 56 बॉलमध्ये आठ सिक्स आणि नऊ फोरच्या मदतीनं 110 रन काढले.

सर्वात मोठा स्कोअर!

हेल्सच्या सेंच्युरीनं सिडनी थंडरनं 5 आऊट 232 रन्स केले. हा बिग बॅश स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वोच्च स्कोअर आहे. थंडरनं यावेळी होबार्ट हुरिकेन्सचा (Hobart Hurrcianes) रेकॉर्ड मोडला. होबार्टनं 2017 साली मेलबर्न रेनगेड्स (Melbourne Renegades) विरुद्ध खेळताना 8 आऊट 223 रन्स काढले होते.

सिडनी सिक्सर्सला 233 रन्सचं आव्हान पेलवलं नाही. त्यांना 20 ओव्हर्समध्ये 186 पर्यंतच मजल मारता आली. यामुळे थंडरनं या मॅचमध्ये 46 रननं मोठा विजय मिळवला.

हेल्सची झाली होती हकालपट्टी!

इंग्लंडनं 2019 साली पहिल्यांदाच वर्ल्ड कप (ICC Cricket World Cup 2019) जिंकला. हेल्सची त्याच्या चुकीमुळे वर्ल्ड टीममधून हकालपट्टी झाली होती. हेल्स स्पर्धेपूर्वी ड्रग्ज टेस्टमध्ये दोषी आढळला होता. त्यामुळे त्याची टीममधून हकालपट्टी करण्यात आली होती.

( वाचा : ऑस्ट्रेलिया गाजवलेल्या टी. नटराजनचं गावात राजेशाही स्वागत, पाहा VIDEO )

इंग्लंडच्या वन-डे टीमचा कॅप्टन इऑन मॉर्गननं (Eoin Morgan) हेल्सच्या त्या कृतीचं वर्णन ‘विश्वासाला आणि टीम भावनेला तडा’ या शब्दात केलं होतं. त्यानंतर 22 महिन्यामध्ये हेल्सचं आंतरराष्ट्रीय टीममध्ये पुनरागमन झालेलं नाही. अगदी भारत दौऱ्याची टीम निवडल्यानंतरही इंग्लंड क्रिकेट टीमचे चीफ सिलेक्टर ईडी स्मिथ यांनी हेल्सच्या निवडची शक्यता फेटाळली होती. त्यामुळे बिग स्पर्धेतील फॉर्म आणि आक्रमक सेंच्युरीनंतरही त्याची यावर्षी भारतामध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी टीममध्ये निवड होण्याची शक्यता अंधूक आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: